कॉँग्रेसमध्ये प्राण फुंकण्यासाठी आता प्रशांत किशोर यांना पाचारण, महाराष्ट्रात आघाडीचा सल्ला देण्यासाठी सेटींग केल्याचीही चर्चा


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : सततच्या पराभवामुळे गलितगात्र झालेल्या कॉँग्रेसमध्ये प्राण फुंकण्यासाठी अखेर निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांना पाचारण करण्यात आले आहे. ओडिशा, बिहार व उत्तर प्रदेश सारख्या राज्यांत एकट्याने लढण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. मात्र, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये आघाडीचा सल्ला दिला आहे. हा सल्ला देण्यासाठी सेटींग केल्याचीही चर्चा आहे.Prashant Kishor is now being called to breathe life into the Congress, There is also talk of setting up to advise the front in Maharashtra

काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी प्रशांत किशोर यांची चर्चा झाली होती. महाराष्ट्रात आघाडीचा सल्ला देण्यामागे ही चर्चाच कारणीभूत असल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर सध्या पश्चिम बंगालमध्ये प्रशांत किशोर ममता बॅनर्जी यांच्यासोबत असल्याने तेथेही आघाडीचा सल्ला त्यांनी दिला आहे. प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला महाराष्ट्र, पश्चिम बंगाल व तामिळनाडूत मजबूत आघाडी करण्याची शिफारस केली आहे.या तिन्ही राज्यांत लोकसभेच्या 139 जागा आहेत. विशेषत: महाराष्ट्र व तामिळनाडूत काँग्रेसचे आघाडी सरकार आहे. तामिळनाडू, बंगाल व महाराष्ट्रातील लोकसभा मतदार संघांवर विरोधी पक्षांचे प्राबल्य आहे.आघाडी करण्यामागे महाराष्ट्रात शरद पवार व बंगालमध्ये ममता बँनर्जी कारणीभूत आहेत. तर तामिळनाडूत एम. के. स्टॅलीन यांच्या द्रमुकनेही सातत्याने केंद्राविरोधात भूमिका घेतली आहे.

बंगालमध्ये ममतांचे सरकार आहे. त्यांनी विधानसभा व लोकसभा निवडणुकीत दमदार कामगिरी केली आहे. 2019 च्या निवडणुकीत त्यांनी लोकसभेच्या 42 पैकी 22 जागा जिंकल्या होत्या. 2 जागांवर काँग्रेसचा विजय झाला होता. त्यामुळे काँग्रेसने ममतांच्या तृणमूल काँग्रेसशी आघाडी केली तर 2024 च्या निवडणुकीत बंगालमधील चित्र वेगळे दिसू शकते.

प्रशांत किशोर यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या मुद्यावर जवळपास 4 तास सादरीकरण सादर केले. त्यात त्यांनी काँग्रेसला आगामी लोकसभा निवडणुकीत अवघ्या 370 जागांवर लक्ष्य केंद्रीत करण्याचा सल्ला दिला. ओडिशा, बिहार व उत्तर प्रदेश सारख्या राज्यांत एकट्याने लढण्यामागची भूमिका स्विकारण्याचा विस्तृत अहवाल सादर केला.

काँग्रेसला 2024 च्या निवडणुकीत लोकसभेच्या 543 पैकी अवघ्या 370 जागांवर लक्ष्य केंद्रीत करण्याचा सल्ला दिला. यात मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ व गुजरातमधील बहुतांश जागांचा समावेश आहे. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकांत काँग्रेसला अवघ्या 52 जागांवर समाधान मानावे लागले होते. पक्ष 210 जागांवर दुसºया क्रमांकावर राहिला.

म्हणजे, देशातील 262 लोकसभा मतदार संघात काँग्रेस व भाजपत थेट मुकाबला आहे. याशिवाय 2009 च्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेस 350 जागांवर पहिल्या किंवा दुसºया क्रमांकावर राहिली. किशोर यांनी याच आधारावर काँग्रेसला 370 जागांवर लक्ष्य केंद्रीत करण्याचा सल्ला दिला आहे. 2009 च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचा 350 जागांवर थेट सामना झाला. त्यातील 206 जागांवर त्यांना विजय मिळाला होता.

प्रशांत किशोर यांनी आपल्या सादरीकरणात काँग्रेसला बिहार, यूपी व ओडिशात स्वबळ आजमावण्याचा सल्ला दिला आहे. या राज्यांत लोकसभेच्या एकूण 140 जागा आहेत. राजकीय वतुर्ळात दिल्लीच्या सत्तेचा मार्ग यूपी-बिहारमधून जात असल्याचे मानले जाते. बिहार, उत्तर प्रदेश व ओडिशात काँग्रेसला एकही विश्वासू सहकारी मिळाला नाही. काँग्रेसने बिहारमध्ये राजदसोबत निवडणूक लढवली. पण, त्याचा फारसा फायदा झाला नाही.

बिहारमध्ये 2020 च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत काँग्रेसने राजदसोबत आघाडी करुन अनेक निवडणुका लढल्या. पण, गेल्या काही महिन्यांपासून या दोन्ही पक्षांचे मार्ग वेगळे झालेत. बिहारमध्ये लोकसभेच्या 40 जागा आहेत. त्यातील 39 जागा भाजप-जदयु आघाडीच्या ताब्यात आहेत. काँग्रेसच्या खात्यात केवळ 1 जागा आहे. बिहारमधील लोकसभा निवडणुकीचा ट्रेंड पाहिला तर तिथे काँग्रेस-राजद आघाडीला फारसे यश मिळाले नाही.

उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या उत्थानाची जबाबदारी प्रियंका गांधींवर सोपवण्यात आली आहे. पण, प्रियंकांना 2019 ची लोकसभा व 2022 च्या विधानसभा निवडणुकीत कोणतेही यश मिळाले नाही. त्यानंतरही किशोर यांनी उत्तर प्रदेशात आघाडी न करण्याचा सल्ला दिला आहे. प्रत्यक्षात यूपीतही बिहारसारखीच स्थिती आहे. येथे अनेक प्रयोगांनंतरही प्रादेशिक पक्षांना भाजपच्या तुलनेत चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे किशोर यांनी लोकसभा निवडणुकीत ‘एकला चलोरे’चे धोरण स्विकारुन भाजपला थेट आव्हान देण्याचा सल्ला दिला आहे.

प्रशांत किशोर यांच्या सादरीकरणानंतर काँग्रेसने ए.के.अँटोनी, मल्लिकार्जुन खरगे व अंबिका सोनी यांची एक समिती स्थापन केली आहे. बैठकीला उपस्थित नेत्यांनी किशोर यांना काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची विनंती केली आहे. त्यांनी याविषयी 2 मेपर्यंत एखादा ठोस निर्णय घेण्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

Prashant Kishor is now being called to breathe life into the Congress, There is also talk of setting up to advise the front in Maharashtra

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था