वृत्तसंस्था
जयपूर : कोरोनाशी मुकाबल करण्याच्या प्रयत्नांवरून राजस्थानात सत्तारुढ कॉंग्रेस आणि भाजप आमने सामने आले आहेत. दोन्ही पक्षांनी एकमेकांनर आरोप प्रत्यारोप सुरु केले आहेत. सरकारने साडे अकरा लाख लशी वाया घालविल्याचा भाजपचा आरोप मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी फेटाळून लावला. Politics in Rajasthan on vaccination
गेहलोत यांनी म्हटले आहे की, भाजप जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न हेतुपुरस्सर करीत आहे. प्रत्येकाला सोबत घेऊन कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. भाजप मात्र कोरोना योद्ध्यांचे मनोधैर्य खचावे म्हणून गेली १४ महिने अहोरात्र खटाटोप करीत आहे.
गेहलोत यांनी आकडेवारी दिली. ते म्हणाले की, २६ मेअखेर राज्यात एक कोटी ६३ लाखापेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण झाले आहे, जे प्रमाण दोन टक्के आहे. सहा टक्क्यांच्या राष्ट्रीय सरासरीपेक्षा हे प्रमाण बरेच कमी आहे. केंद्राने लशी वाया जाण्याचे प्रमाण दहा टक्के निश्चित केले आहे.
काँग्रेसचे शासन असलेल्या छत्तीसगडमध्ये ३०.२, तर झारखंडमध्ये ३७.३ टक्के टक्के लशी वाया गेल्याचा आरोप झाला आहे. मात्र हे प्रमाण अनुक्रमे ०.९५ टक्के आणि ४.६५ टक्के असल्याचे त्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App