वृत्तसंस्था
चंडीगड : पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि अकाली दलाचे संरक्षक प्रकाश सिंग बादल वयाच्या 94 व्या वर्षी पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. देशाच्या राजकीय इतिहासातले हे रेकॉर्ड आहे. प्रकाश सिंग बादल यांनी आज त्यांच्या पारंपारिक लांबी मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. या आधी लांबी मतदारसंघाचे त्यांनी सहा वेळा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. Political record in the country: At the age of 94, Prakash Singh Badal is contesting from Lambi constituency !!
Shiromani Akali Dal (SAD) patron Parkash Singh Badal files nomination from Lambi constituency.#PunjabElections pic.twitter.com/kcZiZd7scz — ANI (@ANI) January 31, 2022
Shiromani Akali Dal (SAD) patron Parkash Singh Badal files nomination from Lambi constituency.#PunjabElections pic.twitter.com/kcZiZd7scz
— ANI (@ANI) January 31, 2022
प्रकाश सिंग बादल यांनी मुक्तसर जिल्ह्यातील लांबी विधानसभा मतदारसंघातून 94 व्या वर्षी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हे देशातले राजकीय रेकॉर्ड आहे. या आधी महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ मतदारसंघातून सा. रे. पाटील हे 91 व्या वर्षी आमदार होते. तसेच शेकापचे नेते गणपतराव देशमुख हे देखील सांगोल्याचे त्यांच्या वयाच्या नव्वदीत आमदार होते. परंतु 94 वर्षे वय पूर्ण केल्यानंतर प्रकाश सिंग बादल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. असे करणारे ते संपूर्ण देशातले पहिलेच लोकप्रतिनिधी ठरणार आहेत. याखेरीज 1970 च्या दशकात मुख्यमंत्री राहून नव्वदी पार केल्यानंतरही जनतेतून निवडून येऊन लोकप्रतिनिधी होणारे ते पहिलेच नेते ठरणार आहेत.
प्रकाश सिंग बादल हे 1977 मध्ये तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय कृषिमंत्री देखील राहिले आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात देखील त्यांनी स्थान भूषवले आहे. मात्र आता राजकीय नाते संपूर्ण तोडल्यानंतर ते वयाच्या 94 व्या वर्षी पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App