कर्नाटकातील राजकीय घर, चार सख्खे भाऊ आमदार मात्र वेगवेगळ्या पक्षात

विशेष प्रतिनिधी

बेळगाव :कर्नाटकमध्ये एकाच कुटुंबातील चार सख्खे भाऊ आमदार झाले आहेत. देशातली ही पहिलीच घटना आहे. विशेष म्हणजे ते वेगवेगळ्या पक्षातून निवडून आले आहेत.
बेळगावमधील जारकीहोळी कुटुंबातील तिघे भाऊ विधानसभेचे आमदार आहेत.Political house in Karnataka, four Sakha Bhau MLAs, however, in different parties

आता एक भाऊ विधानपरिषदेचा सदस्य झाला आहे. जारकीहोळी कुटुंबातील सर्वात मोठा भाऊ रमेश हे गोकाक विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. भालचंद्र हे आरभावी मतदारसंघाचे आमदार आहेत. हे दोघंही भाजपचे आमदार आहेत.



तर काँग्रेसच्या तिकिटावर सतीश हे यमकनमर्डी मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आले. आता अपक्ष म्हणून लखन जारकीहोळी हे विधानपरिषदेवर निवडून गेले आहेत.रमेश जारकीहोळी 1999 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले.

त्यानंतर सलग पाचवेळा त्यांनी विधानसभेवर निवडून येण्याचा पराक्रम केला. पण 2019मध्ये त्यांनी काँग्रेसचा हात सोडला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे भाजपकडूनही ते विजयी झाले. भाजपकडून निवडणूक लढवलेले भालचंद्र जारकीहोळी हेही भाजप सत्तेत असताना मंत्रिपदावर होते.

2008 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. धर्मनिरपेक्ष जनता दलात असणाºया सतीश जारकीहोळी यांनी 2006 मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला, आणि 2008 मध्ये ते विधानसभेवर निवडून गेले. राज्यात काँग्रेस पक्षाचं सरकार असताना सतीश जारकीहोळी यांनी मंत्रीपदही भूषवलं.

Political house in Karnataka, four Sakha Bhau MLAs, however, in different parties

महत्त्वाच्या बातम्या

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात