‘पोलार प्रित’ ने घडविला इतिहास, दक्षिण गोलार्धावर हिमवृष्टीत मोहीम फत्ते


वृत्तसंस्था

लंडन : दक्षिण गोलार्धावर तुफान हिमवृष्टीमध्ये चाळीस दिवस आणि अकराशे किलोमीटरचा अत्यंत अवघड ट्रेक एकटीने, कोणाच्याही मदतीशिवाय पूर्ण करत ब्रिटिश सैन्यातील भारतीय वंशाच्या कॅप्टन हरप्रित चंडी या महिला अधिकाऱ्याने इतिहास घडविला आहे. अशा प्रकारचा ट्रेक करणाऱ्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला ठरल्या आहेत. ‘Polar Preet’ made history, with snow-covered expeditions over the Southern Hemisphere

हरप्रित चंडी या ब्रिटिश सैन्यातील महिला शीख अधिकारी आहेत. त्यांनी लाइव्ह ब्लॉगद्वारे आपल्या कामगिरीची माहिती दिली. ‘पोलार प्रित’ या नावाने ओळखल्या जात असलेल्या हरप्रित यांनी दक्षिण गोलार्धातील उणे ५० अंश सेल्सिअस तापमानात ही कामगिरी केली. चाळीस दिवसांच्या या ट्रेकमध्ये त्यांनी स्लेजवर (बर्फात ढकलायची गाडी) आपले सर्व सामान लादत एकटीने ती ओढत प्रवास केला. या चाळीस दिवसांत त्यांनी १,१२७ किलोमीटर अंतर कापले.या ट्रेकमध्ये त्यांनी अनेकदा ६० किमी प्रतितास या वेगाने वाहणाऱ्या अतिथंड वाऱ्यांचा सामना केला. कॅप्टन हरप्रित चंडी यांनी ट्रेकच्या सुरुवातीलपासून लाइव्ह ट्रॅकिंग मॅप अपलोड केला होता. वेळोवेळी त्यांनी ब्लॉग लिहून मोहिमेची माहितीही दिली होती.

‘Polar Preet’ made history, with snow-covered expeditions over the Southern Hemisphere

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था