पंतप्रधानांच्या सुरक्षेत त्रुटी : पंतप्रधानांचे सर्व ट्रॅव्हल रेकॉर्ड सुरक्षित ठेवण्याचे पंजाब – हरियाणा हायकोर्टाला सुप्रीम कोर्टाचे निर्देश


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षेत त्रुटी आढळली आणि तिचे उल्लंघन झाले. या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने गंभीर दखल घेतली असून पंतप्रधानांचे सर्व ट्रॅव्हल रेकॉर्ड सुरक्षित ठेवण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने पंजाब – हरियाणा हायकोर्टाला दिले आहेत. PM’s security flaws: Supreme Court directs Punjab-Haryana High Court to keep all PM’s travel records safe

पंजाब सरकार या सर्व प्रकरणात स्वतंत्रपणे चौकशी करत असल्याची बाजू पंजाब सरकारच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात आज मांडली. त्यावर केंद्र सरकारनेही आपली बाजू मांडली. याचिकाकर्ते वकील मनिंडर सिंह यांनी पंतप्रधानांची सुरक्षा व्यवस्था सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी शोधण्याचा अधिकार फक्त राज्य सरकारचा असू शकत नाही. त्यात केंद्रीय एजन्सीची महत्त्वाची भूमिका असलीच पाहिजे, अशी बाजू मांडली.

त्यानंतर सुप्रीम कोर्टाने या सगळ्यांच्या पलीकडे जात पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाला पंतप्रधानांचे सर्व ट्रॅव्हल रेकॉर्ड सुरक्षित ठेवण्याचे निर्देश दिले आहेत याचा अर्थ संपूर्णपणे कोर्ट मॉनिटर ही चौकशी आणि तपास होणार आहे.

पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत फिरोजपुर जिल्ह्यात हुस्सैनिवला येथे मोठी त्रुटी राहिली. पंतप्रधानांचा ताफा 15 ते 20 मिनिटे हुसैनीवाला जवळ उड्डाणपुलावर अडकून राहिला. तेथे मोठ्या प्रमाणावर जमाव जमला होता. यावरून भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षांमध्ये प्रचंड राजकीय गदारोळ सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने कोर्टातले ज्येष्ठ वकील मनिंदरसिंग यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. त्याची तातडीची दखल सुप्रीम कोर्टाने घेतली आहे आणि केंद्र आणि राज्य सरकार यांचा स्वतंत्र तपास चालू असतानाच सुप्रीम कोर्टाने पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाला मध्ये आणत त्यांना पंतप्रधानांचे सर्व ट्रॅव्हल रेकॉर्ड सुरक्षित ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

याचा अर्थ पंतप्रधानांचे ट्रॅव्हल रेकॉर्ड मध्येच कोठेतरी गहाळ अथवा होऊ शकते अथवा त्यात कुठे गडबड होऊ शकते, असा सुप्रीम कोर्टाला थेट संशय आहे. त्यामुळे पंजाब आणि हायकोर्टाला सुप्रीम कोर्टाने पंतप्रधानांचे सर्व ट्रॅव्हल रेकॉर्ड सुरक्षित ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. याचा अर्थ पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी प्रकरणाची चौकशी आणि तपास कोर्टाच्या देखरेखीखाली होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

PM’s security flaws: Supreme Court directs Punjab-Haryana High Court to keep all PM’s travel records safe

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण