प्रतिनिधी
नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड केस मध्ये सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या अधिकाऱ्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांची वारंवार चौकशी केल्यानंतर त्यांच्यासह सर्व काँग्रेस नेत्यांनी 5 ऑगस्टला काळे कपडे घालून केंद्र सरकार विरोधात निदर्शने केली होती यानंतर पाच दिवस उलटून गेले आणि आता आज 10 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या काळ्या कपड्यांची दखल घेतली आहे!! याला म्हणतात प्रॉम्ट रिस्पॉन्स टाईम!! PM Narendra Modi targets gandhi family over their black clothes Agitation
वास्तविक ज्या दिवशी सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्या सह सर्व काँग्रेसने त्यांनी कार्यकर्ते घातले होते, त्याच दिवशी भाजपच्या इतर सर्व नेत्यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर जोरदार शरसंधान साधून घेतले होते. त्यावेळी मोदींना काँग्रेसच्या आंदोलनाची दखलही घ्यावीशी वाटली नव्हती. काँग्रेसचे आंदोलन होऊन 5 दिवस उलटून गेल्यानंतर आज सुरत मधल्या तिरंगा यात्रेच्या उद्घाटन सोहळ्याला संबोधित करताना मोदींना काँग्रेसच्या काळा कपड्यातल्या आंदोलनाची दखल घ्यावीशी वाटली आणि त्यांनी काँग्रेस नेत्यांवर काळी जादू करण्याचा आरोप लावून घेतला.
राष्ट्रीय तपास यंत्रणांचा केंद्र सरकारकडून गैरवापर होत असल्याचे सांगत काँग्रेसने 5 ऑगस्ट रोजी देशव्यापी आंदोलन छेडले होते. यावेळी राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी काळे कपडे परिधान करत केंद्र सरकारचा निषेध केला होता. पण यावरच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निशाणा साधला आहे.
काळे कपडे घालत काही लोक काळी जादू करण्याचा प्रयत्न करत अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत आहेत. पण जनतेचा त्यांच्यावर कधीही विश्वास बसणार नाही, असे म्हणत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.
नैराश्यातून काळ्या जादूकडे
देशात काही लोक निराशेच्या गर्तेत बुडाले असून नकारात्मकतेच्या भोव-यात सापडले आहेत. त्यामुळे ते सातत्याने सरकारविरोधात खोटं बोलत आहेत. पण देशातील जनता त्यांच्यावर विश्वास ठावायला तयार नाही, त्यामुळे आलेल्या नैराश्यातून हे लोक आता काळ्या जादूकडे वळत असल्याचे दिसत आहे, अशा शब्दांत मोदींनी काँग्रेसच्या आंदोलनावर खोचक टीका केली आहे.
जनता विश्वास ठेवणार नाही
काळी जादू पसरवण्याचा यांनी कसा प्रयत्न केला ते देशाने 5 ऑगस्ट रोजी पाहिलं आहे. त्यासाठी त्यांनी काळे कपडे परिधान केले. काळे कपडे घातल्याने आपले नैराश्य दूर होईल असे त्यांना वाटत आहे. पण त्यांनी कितीही काळी जादू केली, अंधश्रद्धेवर विश्वास ठेवला तरी जनतेच्या मनात त्यांच्याबाबत कधीही विश्वास निर्माण होऊ शकत नाही, अशी टीकाही नरेंद्र मोदींनी काँग्रेस नेत्यांवपर केली आहे.
स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान करण्याचा प्रयत्न
त्यासोबतच मोदींनी आम आदमी पार्टीवर देखील निशाणा साधला आहे. देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. त्यासाठी देश तिरंग्याच्या रंगांत रंगला आहे. पण या पवित्र सोहळ्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत.
आपल्या महान स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान करण्याचा डाव त्यांनी आखला आहे. त्यामुळे आपण त्यांची मानसिकता ओळखणे गरजेचे आहे, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना टोला लगावला आहे. काँग्रेसने मोदींवर पलटवार करत त्यांचा काळ्या कपड्यात गंगास्नान करण्याचा फोटो आपल्या ट्विटर हँडल वरून प्रसिद्ध केला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App