PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘स्वच्छ भारत मिशन अर्बन 2.0’ आणि ‘अमृत 2.0’चा शुभारंभ केला. यादरम्यान, कार्यक्रमाला संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले की, 2014 साली देशवासीयांनी भारताला उघड्यावर शौचपासून मुक्त करण्याची प्रतिज्ञा घेतली होती. 10 कोटींपेक्षा जास्त शौचालये बांधून देशवासीयांनी ही प्रतिज्ञा पूर्ण केली. आता ‘स्वच्छ भारत मिशन-अर्बन २.०’चे ध्येय म्हणजे कचरामुक्त शहर, कचऱ्याच्या ढिगाऱ्यांपासून शहराला पूर्णपणे मुक्त करणे आहे. pm narendra modi launches swachh bharat mission urban 2 and mission amrut 2
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘स्वच्छ भारत मिशन अर्बन 2.0’ आणि ‘अमृत 2.0’चा शुभारंभ केला. यादरम्यान, कार्यक्रमाला संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले की, 2014 साली देशवासीयांनी भारताला उघड्यावर शौचपासून मुक्त करण्याची प्रतिज्ञा घेतली होती. 10 कोटींपेक्षा जास्त शौचालये बांधून देशवासीयांनी ही प्रतिज्ञा पूर्ण केली. आता ‘स्वच्छ भारत मिशन-अर्बन २.०’चे ध्येय म्हणजे कचरामुक्त शहर, कचऱ्याच्या ढिगाऱ्यांपासून शहराला पूर्णपणे मुक्त करणे आहे.
पीएम मोदी म्हणाले, “मिशन अमृतच्या पुढील टप्प्यात सांडपाणी आणि सेप्टिक व्यवस्थापन वाढवणे, आपल्या शहरांना पाणी सुरक्षित शहरे बनवणे आणि नद्यांमध्ये कुठेही गलिच्छ नाले पडणार नाहीत याची खात्री करणे, हे देशाचे ध्येय आहे. स्वच्छ भारत अभियान आणि अमृत मिशनचा आतापर्यंतचा प्रवास खरोखरच प्रत्येक देशवासीयाला अभिमानाने भारून टाकणारा आहे. यात मिशन आहे, आदर आहे, सन्मानदेखील आहे, देशाची महत्त्वाकांक्षादेखील आहे आणि मातृभूमीबद्दल अतुलनीय प्रेमदेखील आहे.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, “स्वच्छ भारत मिशन आणि मिशन अमृतचा पुढील टप्पादेखील बाबासाहेबांची स्वप्ने पूर्ण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. बाबासाहेबांचा असमानता दूर करण्याचे एक उत्तम माध्यम म्हणून शहरी विकासावर विश्वास होता. ही परिस्थिती बदलण्यावर, ही विषमता दूर करण्यावर बाबासाहेबांनी खूप भर दिला. स्वच्छ भारत मिशन आणि मिशन अमृतचा पुढील टप्पादेखील बाबासाहेबांची स्वप्ने पूर्ण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.
मोदी म्हणाले, “आमचे स्वच्छता मित्र दररोज हातात झाडू घेऊन रस्ते स्वच्छ करणारे आमचे बंधू आणि भगिनी, कचऱ्याची दुर्गंधी सहन करत कचरा साफ करणारे आमचे मित्र, खऱ्या अर्थाने या मोहिमेचे महान नायक आहेत. कोरोनाच्या कठीण काळात देशाने त्यांचे योगदान जवळून पाहिले आहे. जेव्हा निर्मल गुजरात मोहीम जनआंदोलन बनली, तेव्हा त्याचे खूप चांगले परिणामही मिळाले. यामुळे केवळ गुजरातला नवी ओळख मिळाली नाही, तर राज्यात पर्यटनही वाढले. जनआंदोलनाचा हा भाव स्वच्छ भारत मिशनच्या यशाचा आधार आहे.
पंतप्रधान म्हणाले, “आम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की स्वच्छता फक्त एक दिवस, पंधरवडा, वर्ष किंवा काही लोकांचे काम नाही. स्वच्छता ही प्रत्येकासाठी एक मोठी मोहीम आहे, प्रत्येक दिवस, प्रत्येक पंधरवडा, दरवर्षी, पिढ्यानपिढ्या स्वच्छता ही जीवनशैली आहे, स्वच्छता हा जीवनमंत्र आहे.”
pm narendra modi launches swachh bharat mission urban 2 and mission amrut 2
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App