वृत्तसंस्था
नवी दिल्ली : तुझ्या कामगिरीचा सार्थ अभिमान आहे. तू तुझ्याबरोबर कुटुंबाचे आणि देशाचे नाव उंचावले आहेस, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भालाफेकीत सुवर्णपदक विजेत्या सुमित अँटीलचे कौतुक केले आहे. देशातील अनेक तरुण तुझ्या अभिमानास्पद कामगिरीने प्रेरित होतील, असा विश्वासही मोदी यांनी त्याच्याशी संपर्क साधताना व्यक्त केला.PM Narendra Modi congratulated sumit Antil For His performance and winning Gold in Tokyo Para Olympic
टोकिया पॅराऑलिंपिकमध्ये सुमित अँटील याने भालाफेकीत जागतिक विक्रमासह सुवर्णपदक जिंकून भारताची मान जगात उंचवली आहे. (Sport Class F64) मध्ये त्याने ६८.५५ मीटरवर भाला फेक करून सुवर्ण पदकावर भारताचे नाव कोरले. त्या बद्दल त्याचे जगाबरोबर भारतातही मोठे कौतुक होत आहे.
सुमित हा मूळचा हरियाणातील सोनिपतचा आहे. विशेष म्हणजे टोकियो ऑलिपिंकमध्ये हरियाणाच्याच पानिपतमधील नीरज चोप्राने भालाफेकीमध्ये सुवर्ण पदक पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली. ऑलिपिंक आणि पॅराऑलिपिंकमधील भालाफेकीची दोन्ही सुवर्णपदके भारताच्या म्हणजे हरियाणाच्या खेळाडूंनी पटकावली आहेत. हा एक वेगळाच योगायोग जुळून आला आहे.
#WATCH: PM Modi telephoned #SumitAntil &congratulated him on winning Gold & for a historic performance PM told him that he made the nation proud&appreciated his spirit of resilience. He added that youngsters would be inspired by Sumit.He pointed that he has made his family proud pic.twitter.com/PwKnAGG0rS — ANI (@ANI) August 30, 2021
#WATCH: PM Modi telephoned #SumitAntil &congratulated him on winning Gold & for a historic performance
PM told him that he made the nation proud&appreciated his spirit of resilience. He added that youngsters would be inspired by Sumit.He pointed that he has made his family proud pic.twitter.com/PwKnAGG0rS
— ANI (@ANI) August 30, 2021
सुमित अँटीलने भारताला ऑलिपिंकमध्ये दुसरे सुवर्ण पदक मिळताच देशात जन्माष्टमीच्या आनंद अधिकच द्विगुणित झाला आहे. सुमितच्या सोनिपत गावात तर दिवाळीचा सुरु आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमितशी संपर्क साधून त्याचे कौतुक केले. तुझी कामगिरी देशासाठी अभिमानास्पद असून प्रेरक अशी आहे. तुझ्यामुळे तुझ्या कुटुंबाची आणि देशाची मान गौरवाने उंचावली आहे, असे मोदी यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App