वृत्तसंस्था
नवी दिल्ली : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे अनुयायी आहेत. ते बाबासाहेबांचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने काम करत आहेत,’ अशा शब्दांत माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुक्रवारी मोदींवर स्तुतीसुमने उधळली आहेत.PM Modi Is True Follower of Ambedkar Says Former President Ram Nath Kovind; said – Modi is making Babasaheb’s dream come true
कोविंद यांनी यासंबंधी मोदी सरकारने शिक्षण, कामगार कल्याण, महिला सक्षमीकरण व देशाला स्वावलंबी बनवण्यासाठी उचललेल्या विविध योजनांचा दाखला दिला. मोदींनी जम्मू काश्मीरमधून कलम 370 रद्दबातल करून बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण केल्याचेही ते म्हणालेत.
माजी राष्ट्रपती म्हणाले – ‘बाबासाहेबांनी संविधान सभेच्या मसुदा समितीच्या अध्यक्षपदी असताना जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देण्याचा प्रस्ताव फेटाळून लावला होता. पण नंतर घटनाक्रम क्लिष्ट झाल्यामुळे जम्मू काश्मीरला विशेष दर्जा द्यावा लागला. हे पूर्णतः बाबासाहेबांच्या इच्छेविरुद्ध होते.’
‘जम्मू काश्मीरसंबंधीची ही असमानता मोदी सरकारने 2019 मध्ये दूर केली. सरकारचा यासंबंधीचा आदेश बाबासाहेबांचे आदर्शाची पूर्तता करणारा आहे. भारताचा राष्ट्रपती म्हणून मला या आदेशावर स्वाक्षरी करण्याचे भाग्य लाभले हे मी माझे नशीब समजतो.’
माजी राष्ट्रपती ‘आंबेडकर व मोदी-रिफॉर्म्स आयडियाज परफॉर्म्स इम्प्लिमेंटेशन’ नामक पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. हे पुस्तक ब्ल्यूकार्ट डिजिटल फाउंडेशनने संकलित केले आहे.
कोविंद म्हणाले – ‘स्वातंत्र्य लढ्यात देश जातियवादात होरपळत होता, तेव्हा नेत्यांच्या एका मोठ्या गटाने जनतेला धर्माच्या चष्म्यातून न पाहण्याचा सल्ला दिला होता. आपण हिंदू, मुस्लिम, शिख, ईसाई नंतर आहोत. तत्पूर्वी आपण सर्वजण भारतीय आहोत असे ते म्हणाले होते. पण बाबासाहेबांचे विचार याहून उच्च पातळीचे होते.’
‘त्यांनी आपण प्रथम भारतीय, नंतर भारतीय व शेवटपर्यंत भारतीयच असल्याचे जोर देऊन सांगितले. भारतीयत्वच आपली खरी ओळख आहे. देशात जात-पात, धर्माला कोणतेही स्थान नाही असे त्यांनी जनतेला पटवून दिले,’ असे कोविंद म्हणाले.
माजी राष्ट्रपती म्हणाले – ‘नरेंद्र मोदीही सर्वप्रथम भारताची गोष्ट करतात. बाबासाहेबांनी प्रथम भारतीय, नंतर भारतीय व अखेरपर्यंत भारतीय सांगितल्यानुसार मोदीही सदैव भारत प्रथम म्हणतात. त्यामुळे ते बाबासाहेबांचे स्वप्न साकार करत असल्याचे स्पष्ट होते. आज ज्या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे, ते मोदी आंबेडकरांचे सच्चे अनुयायी असल्याचा पुरावा आहे.’
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App