नाशिक : “यह कुटिया भारत के हर गरीब को अपनी लगनी चाहिये,” हे उद्गार कोणी?? आणि कुठे काढले??, याचे उत्तर आहे… नवी दिल्लीतल्या नव्या संसद भवनात!! नव्या संसद भवनावरील भारताच्या राष्ट्रीय चिन्हाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्यावेळी त्यांनी तेथे प्रत्यक्ष बांधकाम करणाऱ्या कामगारांशी, इंजिनीयरशी आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधताना वर उल्लेख केलेले उद्गार काढले!!… पण मुळात हे उद्गार त्यांना स्फुरले नव्हते, तर एका कामगाराने त्यांच्याशी बोलताना, “यह हमे अपनी कुटिया लगती है,” असे उद्गार काढले होते… या उद्गारांना तत्काळ प्रतिसाद देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, “वाह क्या बात है!! यह कुटिया भारत के हर गरीब को अपनी लगनी चाहिये”!!, असे उद्गार काढून इतिहासात आपले आणि त्या कामगाराचे नाव कोरले!! PM Modi inaugurates National Emblem atop new Parliament Building
सारानाथ येथील अशोक स्तंभ आणि त्यावरचे चार सिंह हे भारताचे राष्ट्रीय चिन्ह आहे. त्याची प्रतिकृती नव्या संसद भवनावर साकारली आहे. तब्बल 6.5 मीटर उंच आणि 9500 किलो वजनाची पूर्ण तांब्याची ही प्रतिकृती आहे. तिचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे उपाध्यक्ष राजहंस सिंह यांच्या उपस्थितीत आज केले.
https://youtu.be/QtY9Ke–Eyo
त्यानंतर त्यांनी नव्या संसद भवनाचे काम करणाऱ्या काही कामगार, इंजिनिअर्स आणि अधिकाऱ्यांशी मनमोकळा संवाद साधला. त्यावेळी मोदींनी त्यांना यहा आ कर कैसा लगता है?? यह आप क्या बना रहे है?? आप इट पत्थरवाली बिल्डिंग बना रहे है?? या इतिहास रच रहे है??, असा प्रश्न विचारला. त्यावेळी एका कामगाराने मोदींना, “यह हमे अपनी कुटिया लगती है”, असे उत्तर दिले. पंतप्रधान मोदींना हे उत्स्फूर्त उत्तर अतिशय भावले आणि त्यांनी तत्काळ त्याला प्रत्युत्तर दिले, “यह कुटिया भारत के हर गरीब को अपनी लगनी चाहिये!!”.
मोदींनी या वेळी सर्व कामगारांची आस्थेने चौकशी केली. कोरोना व्हॅक्सिनेशन झाले आहे का??, सर्वांना स्मार्ट कार्डद्वारे रेशन मिळते का?? गावाकडे घरच्यांशी संपर्क होतो का??, असे प्रश्न त्यांनी विचारले. या प्रश्नांना कामगारांनी मोकळेपणाने उत्तरे दिली. मात्र, “यह कुटिया भारत के हर गरीब को अपनी लगनी चाहिये”, हे मोदींचे उद्गार कायमचे कामगारांच्या मनावर कोरले गेले!!
कामगारांविषयी पंतप्रधान मोदींचा हा लगाव फक्त नव्या संसद भवनाच्या बांधकामाच्या वेळीच दिसलेला नाही, तर काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरचे प्रत्यक्ष काम करणाऱ्या कामगार, मजुरांशी देखील त्यांनी उद्घाटनाच्या वेळी संवाद साधला होता. किंबहुना त्यांचे पूजन करून त्यांच्याबरोबर प्रसाद भोजन देखील घेतले होते. आज नव्या संसद भवनावरती उभारलेल्या भारताच्या राष्ट्रीय चिन्हाच्या उद्घाटनाच्या वेळी देखील असाच प्रत्यय आला. तेथेही त्यांनी संसद भवनाचे प्रत्यक्ष काम करणाऱ्या कामगारांशी मनमोकळा सुसंवाद साधला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App