PM Modi Email Threat : पीएम मोदींना जीवे मारण्याची ईमेलद्वारे धमकी, राष्ट्रीय तपास संस्थेने सुरू केला तपास, ईमेलमध्ये 20 किलो आरडीएक्सचा उल्लेख


राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) मुंबई युनिटला पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल धमकी देणारा ईमेल मिळाला आहे. यामध्ये पंतप्रधानाच्या हत्येची धमकी देण्यात आली आहे. या मेलनंतर एनआयएच्या नॅशनल युनिटने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.PM Modi Email Threat: PM Modi threatened to kill by email, National Investigation Agency launches probe, email mentions 20 kg RDX


वृत्तसंस्था

मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) मुंबई युनिटला पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल धमकी देणारा ईमेल मिळाला आहे. यामध्ये पंतप्रधानाच्या हत्येची धमकी देण्यात आली आहे. या मेलनंतर एनआयएच्या नॅशनल युनिटने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

या कटाचा पर्दाफाश होऊ नये म्हणून आपण आत्महत्या करत असल्याचे ई-मेल करणाऱ्याने म्हटले आहे. अज्ञात आरोपीने मेलमध्ये म्हटले आहे की तो आणि त्याचे लोक पंतप्रधान मोदींना मारण्यासाठी तयार आहेत. त्यांच्याकडे 20 किलो आरडीएक्स आणि 20 स्लीपर सेल आहेत.देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप म्हणजेच एसपीजीकडे असते. पंतप्रधानांभोवतीचे पहिले सुरक्षा वर्तुळ एसपीजी जवानांचे असते. त्यामुळे या मेलची माहिती एसपीजीलाही देण्यात आली आहे.

काय आहे ईमेलमध्ये?

ईमेलमध्ये दोन कोटी लोकांना मारण्याचेही म्हटले आहे. या ईमेलमध्ये किती तथ्य आहे आणि तो कुठून आणि कोणी पाठवला, या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न एजन्सी करत आहेत. र्दमेलनुसार हल्ल्याची योजना तयार करण्यात आली आहे. त्यात असेही म्हटले आहे की, ज्या व्यक्तीने हा मेल लिहिला आहे त्याचे अनेक दहशतवाद्यांशी संबंध आहेत.

काय म्हणाले गृहमंत्री दिलीप वळसे पाटील?

वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, देशाच्या पंतप्रधानांना कोणी धमकी देत असेल तर ते योग्य नाही. हे (पत्र) महाराष्ट्रातून गेले आहे का याची चौकशी केली जाईल. सत्य समोर येईल.

आयपी अॅड्रेसवरून शोध सुरू

नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीनेही गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणांना धमकीच्या ई-मेलची माहिती दिली आहे. ज्या मेल आयडीवरून हा मेल आला आहे त्याची चौकशी सुरू आहे. आरोपीचा आयपी अॅड्रेस शोधून त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सुरक्षा दलांना अलर्ट

पंतप्रधान मोदी यांच्या हत्येचा कट उघड झाल्यानंतर सुरक्षा दले सतर्क झाली आहेत. हा प्रँक मेल आहे का याचाही तपास NIA करत आहे. यापूर्वी दिल्लीतील सीमापुरी भागातील एका घरातून आयईडी मिळाल्याची बातमी समोर आली होती. हे प्रकरण अतिशय धक्कादायक होते. जानेवारीमध्ये गाझीपूर फूल मंडीमध्ये सापडलेले हे स्फोटक कुल्लू स्फोटात वापरण्यात आलेल्या स्फोटकासारखेच होते, असे एका बातमीत सांगण्यात आले आहे.

PM Modi Email Threat: PM Modi threatened to kill by email, National Investigation Agency launches probe, email mentions 20 kg RDX

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण