PM Modi New Team : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवीन मंत्रिमंडळ कसे असेल याची ब्लू प्रिंट आता समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चार माजी मुख्यमंत्री मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळवणार आहेत. मंत्रिमंडळात 13 वकील, 6 डॉक्टर, 5 इंजिनिअर असतील. तरुणांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 14 मंत्री असे असतील ज्यांचे वय 50 वर्षांपेक्षा कमी आहे. PM Modi cabinet Expansion PM Modi New Team Will Have 13 Lawyer 6 doctors and 5 engineers
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवीन मंत्रिमंडळ कसे असेल याची ब्लू प्रिंट आता समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चार माजी मुख्यमंत्री मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळवणार आहेत. मंत्रिमंडळात 13 वकील, 6 डॉक्टर, 5 इंजिनिअर असतील. तरुणांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 14 मंत्री असे असतील ज्यांचे वय 50 वर्षांपेक्षा कमी आहे.
मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात चार माजी मुख्यमंत्र्यांसह 18 माजी राज्यमंत्री असतील. त्याचबरोबर 39 माजी आमदारांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे. असे 23 खासदार आहेत ज्यांनी तीन किंवा अधिक वेळा विजय मिळविला आहे.
मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात ज्यांना स्थान मिळाले आहे, त्यापैकी 13 वकील, 6 डॉक्टर, 5 इंजिनिअर, 7 माजी सनदी अधिकारी आहेत. तसेच असेही व्यक्ती आहेत ज्यांना केंद्र सरकारमध्ये काम करण्याचा अनुभव आहे. मंत्रिमंडळाचे सरासरी वय आता 58 वर्षे झाले आहे. 14 मंत्री असे असतील ज्यांचे वय 50 वर्षांपेक्षा कमी आहे. मंत्रिमंडळात 11 महिलांनाही स्थान देण्यात येणार आहे. यापैकी दोघी कॅबिनेट मंत्री बनतील.
मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात 5 अल्पसंख्याक मंत्री असतील. यात 1 मुस्लिम, 1 शीख, 2 बौद्ध, 1 ख्रिश्चन यांचा समावेश असेल. मंत्रिमंडळात 27 ओबीसी मंत्री असतील, त्यातील 5 कॅबिनेट मंत्री बनणार आहेत. यासह 8 अनुसूचित जमातीमधून असतील, त्यापैकी 3 जणांना कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा मिळेल. 12 अनुसूचित जातीमधून असतील, त्यापैकी 2 जणांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात येईल.
PM Modi cabinet Expansion PM Modi New Team Will Have 13 Lawyer 6 doctors and 5 engineers
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App