पीएम केअर्स फंड (PM CARES Fund)मधून DRDOने विकसित केलेल्या ऑक्सिकेयर सिस्टमच्या खरेदीला मंजुरी देण्यात आली आहे. लवकरच याचा देशभरात पुरवठ्याची प्रक्रिया सुरू होईल. डिफेंस रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायजेशन (Defense Research and Development Organization- DRDO) तर्फे बुधवारी याबाबत माहिती देण्यात आली आहे. PM CARES Fund has approved procurement of 1,50,000 units of Oxycare System developed by DRDO
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पीएम केअर्स फंड (PM CARES Fund)मधून DRDOने विकसित केलेल्या ऑक्सिकेयर सिस्टमच्या खरेदीला मंजुरी देण्यात आली आहे. लवकरच याचा देशभरात पुरवठ्याची प्रक्रिया सुरू होईल. डिफेंस रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायजेशन (Defense Research and Development Organization- DRDO) तर्फे बुधवारी याबाबत माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, डीआरडीओच्या अँटी कोविड औषधालाही 2-deoxy-D-glucose (2-DG) नुकतीच ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे.
Under this sanction 1,00,000 manual and 50,000 automatic Oxycare systems along with NRBM masks are being procured. The Oxycare system delivers supplemental oxygen based on the SpO2 levels and prevents the person from sinking in to a state of Hypoxia, which can be fatal: DRDO — ANI (@ANI) May 12, 2021
Under this sanction 1,00,000 manual and 50,000 automatic Oxycare systems along with NRBM masks are being procured. The Oxycare system delivers supplemental oxygen based on the SpO2 levels and prevents the person from sinking in to a state of Hypoxia, which can be fatal: DRDO
— ANI (@ANI) May 12, 2021
वृत्तसंस्था एएनआयनुसार, पीएम केअर्स फंडने 322.5 कोटी रुपयांच्या खर्चाने डीआरडीओद्वारे विकसित ऑक्सिकेयर सिस्टमच्या 1,50,000 युनिट खरेदीसाठी मंजुरी दिली आहे. डिफेंस रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायजेशन (Defense Research and Development Organization- DRDO) नुसार, ही एक SpO2 आधारित आक्सिजन पुरवठा करणारी यंत्रणा आहे. यामुळे आक्सिजनला नियंत्रित करता येते. याद्वारे SpO2च्या आवश्यक पातळीवर रुग्णाला ऑक्सिजनचा पुरवठा करता येतो.
ही ऑक्सिकेअर सिस्टिम डीआरडीओच्या बंगळुरूस्थित डिफेन्स बायो-इंजिनिअरिंग अँड इलेक्ट्रो मेडिकल लॅबरोटरीद्वारे विकसित करण्यात आली आहे. याची निर्मिती प्रामुख्याने उंच ठिकाणी तैनात असलेल्या जवानांकरिता करण्यात आली होती. ही सिस्टिम पूर्णपणे स्वदेशी असण्याबरोबरच अतिशय मजबूत असून फील्ड ऑपरेशन्स ध्यानात घेऊन विकसित करण्यात आलेली आहे.
PM CARES Fund has approved procurement of 1,50,000 units of Oxycare System developed by DRDO
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App