वृत्तसंस्था
नवी दिल्ली : केंद्र सरकारने १० लाख जणांना रोजगार देण्याची महत्वकांक्षी योजना आखली आहे. भारत आणि यूएई यांच्यातील करारामुळे हे शक्य होणार असल्याचा दावा केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केला आहे.Plans to provide employment to one million people; Central Government’s Trade Agreement with UAE
भारत आणि यूएई यांच्यात व्यापारी करार झाला आहे. त्या अंतर्गत मध्य पूर्वीतील देशांबरोबर भारताचे व्यापारी संबंध दृढ होण्यास मदत मिळणार आहे.केंद्रीय मंत्री आज म्हणाले की, लघु उद्योग, स्टार्टअप्स, शेतकरी, व्यापारी यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.
या करारामुळे वस्तू आणि सेवांची उपलब्धता वाढेल आणि तरुणांना नवीन संधी मिळेल, स्टार्टअप्सना नवीन बाजारपेठ मिळेल. याचा अर्थव्यवस्थेला फायदा होणार आहे.ते म्हणाले की, सर्व क्षेत्रांशी चर्चा केल्यानंतर या करारामुळे १० लाख लोकांना रोजगार मिळणार असल्याचे समोर आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App