वृत्तसंस्था
पोर्टब्लेअर : अंदमान आणि निकोबार बेटांना भविष्यात देशभक्तांसाठी तीर्थक्षेत्र बनवणार आहे, असा निर्धार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस बेटावर आयोजित एका सभेत शाह बोलत होते. शाह हे अंदमानच्या दौऱ्यावर आले आहेत. शाह म्हणाले, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस आणि सरदार वल्लभभाई पटेल यांना इतिहासात पुरेसा आदर आणि सन्मान मिळाला नाही. Planning to make andaman and nicobar Islands Tirthsthan for desh bhakts says amit shah
ते म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनीच दोन्ही स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान केला. अंदमानमध्ये ३० डिसेंबर १९४३ रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भारतीय भूमीवर प्रथमच ज्या ठिकाणी ध्वज फडकवला होता, त्या ठिकाणी ‘फ्लॅग पॉइंट’चे उद्घाटन केले. आम्ही सरदार पटेल यांच्या योगदानाचा आणि बलिदानाचा सन्मान करण्यासाठी केवडियामध्ये जगातील सर्वात उंच पुतळा उभारला. मजबूत भारत बनवण्याचे त्यांचे योगदान विसरणे अशक्य आहे.” “भविष्यात, अंदमान आणि निकोबार बेटांना देशभक्तांसाठी तीर्थक्षेत्र बनवण्याची आमची योजना आहे.
आम्ही नेताजींची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरी करायला सुरुवात केली आहे. लवकरच आम्ही पोर्ट ब्लेअरमध्ये नेताजींचे भव्य स्मारक उभारू. देशातील सर्व युवकांनी एकदा अंदमानला भेट देऊन स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या त्याग समजून घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, अंदमान आणि निकोबार बेटांवर २९९ कोटी रुपयांचे १४ विकास प्रकल्प आणि ६४३ कोटी रुपयांच्या १२ प्रकल्पांची पायाभरणी केली आहे. तसेच केंद्र सरकार या बेटांच्या विकासासाठी वचनबद्ध आहे, असेही गृहमंत्री शाह म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App