पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी कोरोना प्रतिबंधक लसीकरणावरून सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत आहेत. लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधानांचा फोटो का असा सवालही त्यांनी केला होता. मात्र, आता पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या लसीकरणानंतर प्रमाणपत्रावर ममता बॅनर्जी यांचा फोटो छापून येणार आहे. Photo of Mamata Banerjee now in West Bengal on corona vaccination certificate
विशेष प्रतिनिधी
कोलकत्ता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी कोरोना प्रतिबंधक लसीकरणावरून सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत आहेत. लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधानांचा फोटो का असा सवालही त्यांनी केला होता.
मात्र, आता पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या लसीकरणानंतर प्रमाणपत्रावर ममता बॅनर्जी यांचा फोटो छापून येणार आहे. कोरोनाची लस घेतल्यानंतर आतापर्यंत लस घेतलेल्या व्यक्तीला उपलब्ध करुन दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो छापला जात होता.
पण आता पश्चिम बंगालमध्ये लसीकरणाच्या तिसºया टप्प्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना देण्यात येणाऱ्या कोरोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा फोटो छापण्यात येणार आहे.
ममता बॅनर्जी या आधीपासूनच केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणावर सवाल उपस्थित करत आल्या आहेत. देशातील सर्व नागरिकांना मोफत लस देण्याचा मुद्दा त्यांनी वारंवार उपस्थित केला आहे.
यातच ममता बॅनर्जी यांनी राज्यातील सर्व मुख्य मंदिरातील पुजाऱ्यांना कोरोना विरोधी लस देण्याचे आदेश दिले आहेत. तिसऱ्या टप्प्यात कोरोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा फोटो छापण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीवेळी तृणमूल काँग्रेसनं कोरोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो छापला जात असल्याच्या मुद्द्यावर आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.
कोरोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो छापला जाणं हे निवडणूक आचारसंहितेच्या नियमांचं भंग असल्याचा आरोप तृणमूलनं केला होता.
पश्चिम बंगालमधील जनतेला मोफत लसीकरण केलं जात आहे. प्रत्येक लसीसाठी सरकारचा ६०० ते १२०० रुपयांचा खर्च होत आहे. राज्यात आतापर्यंत १.४ कोटी जनतेचं लसीकरण झालं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App