इलेक्ट्रिक वाहनांचे युग दृष्टिक्षेपात; पेट्रोलियम कंपन्या उभारणार विविध ठिकाणी २२ हजार चार्जिंग स्टेशन


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : आगामी युग हे इलेक्ट्रिक वाहनांचे युग म्हणून ओळखले जाणार आहे. त्या दिशेने केंद्र सरकारने आणि पेट्रोलियम कंपन्यांनी पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. आता पेट्रोलियम कंपन्या इलेक्ट्रिक वाहने चार्ज करण्यासाठी चार्जिंग स्टेशन उभारणार आहेत. सुमारे २२ हजार चार्जिंग स्टेशन उभारण्याची योजना त्यांनी आखली आहे. petroleum companies to set up 22000 electric vehicle charging stations india

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि इतर दोन सरकारी पेट्रोलियम कंपन्या पाच वर्षांत सुमारे २२००० इलेक्ट्रीक वाहन (EV) चार्जिंग स्टेशन्स उभारण्याची तयारी करत आहेत. यामुळे भविष्यात कार्बन उत्सर्जन शून्य टक्के करण्यास मदत मिळणार आहे. येत्या तीन वर्षांत सुमारे१० हजार पेट्रोल पंपांवर ईव्ही चार्जिंग सुविधा उभारू, असा दावा इंडियन ऑइल कंपनीचे अध्यक्ष श्रीकांत वैद्य यांनी दिली.
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिने ७ हजार तर हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने ३ हजार चार्जिंग स्टेशन्स उभारण्याची योजना आखली आहे.

प्रत्येक २५ किलोमीटरवर चार्जिंग स्टेशन

इंडिय ऑइल५० kW EV चार्जिंग स्टेशन उभारण्याची योजना आखत आहे. कंपनी दर १०० किलोमीटरवर १०० किलोवॅट हेवी-ड्युटी चार्जर बसवणार आहे.

petroleum companies to set up 22000 electric vehicle charging stations india

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात