ताजमहाल हे पूर्वी शिवमंदिरच होते. येथील बंद असलेल्या २२ खोल्यांत हिंदू मूर्ती आणि धर्मग्रंथ अस्तित्वात आहेत. त्यामुळे या खोल्या उघडण्यात याव्यात अशी याचिका उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत काही इतिहासकार आणि काही हिंदू गटांनी हे स्मारक जुने शिवमंदिर असल्याच्या दाव्यांचा हवाला दिला आहे. Petition in court to open 22 closed rooms of Taj Mahal, Hindu idols and scriptures in those rooms
विशेष प्रतिनिधी
अलाहाबाद : ताजमहाल हे पूर्वी शिवमंदिरच होते. येथील बंद असलेल्या २२ खोल्यांत हिंदू मूर्ती आणि धर्मग्रंथ अस्तित्वात आहेत. त्यामुळे या खोल्या उघडण्यात याव्यात अशी याचिका उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत काही इतिहासकार आणि काही हिंदू संघटनाचा हे स्मारक जुने शिवमंदिर असल्याच्या दाव्यांचा हवाला दिला आहे.
भाजपच्या अयोध्या युनिटचे मीडिया प्रभारी रजनीश सिंह यांनी उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाच्या रजिस्ट्रीमध्ये ही याचिका दाखल केली होती. रिट याचिका अद्याप सुनावणीसाठी आलेली नाही. रिट याचिकेत, रजनीश सिंग यांनी काही इतिहासकारांच्या दाव्याचा हवाला दिला की स्मारक हे जुने शिवमंदिर आहे.
मुघल सम्राट शाहजहानने ते पाडले आणि समाधीत रूपांतरित केले. अनेक हिंदू गट ताजमहाल हे जुने शिवमंदिर असल्याचा दावा करत असल्याने या प्रकरणाची चौकशी करून वादावर पडदा पडला पाहिजे, असे याचिकेत म्हले आहे. ताजमहालच्या तळघर आणि वरच्या मजल्यांमध्ये वीस पेक्षा जास्त बंद खोल्या होत्या. त्या लोकांसाठी खुल्या नाहीत. त्या खोल्यांमध्ये हिंदू मूर्ती आणि धर्मग्रंथ आहेत. त्यामुळे हे सिद्ध होते की ताजमहाल हे एक शिव मंदिर आहे.
मुघल सम्राट शाहजहानने शिव मंदिराला पत्नी मुमताज महलच्या मृत्यूनंतर स्मारकात रूपांतरित केल्याचा दावा तपासण्यासाठी एएसआयला तथ्य शोध समिती स्थापन करण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे. त्यावर एएसआयला अहवाल सादर करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती न्यायालयाने केली. काही लोकांचा असाही विश्वास आहे की तेजो महालय किंवा ताजमहाल हे ज्योतिलिंर्गांपैकी एक आहे. चार मजली इमारतीच्या वरच्या आणि खालच्या भागात अंदाजे २२ खोल्या) खोल्या आहेत. ज्या कायमस्वरूपी बंद आहेत आणि पी एन ओक सारख्या अनेक इतिहासकार आणि करोडो हिंदू उपासकांचा ठाम विश्वास आहे की त्या बंद खोल्यांमध्ये, भगवान शिवाचे मंदिर आहे, असे याचिकेत म्हटले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App