NFHS Survey : स्री – पुरुष समानतेच्या दिशेने; 82% महिला पतीला सेक्ससाठी थेट नकार देऊ शकतात, तर 66% पुरुष म्हणतात, “इट्स ओके”!!


प्रतिनिधी

नवी दिल्ली : राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणाच्या (NFHS) अहवालातून काही महत्त्वपूर्ण आकडेवारी समोर आली असून देशातल्या महिलांना असलेले अधिकार, त्यांची आर्थिक स्थिती, त्यांचे आर्थिक आणि सामाजिक योगदान, स्त्री – पुरुष संबंध याविषयी हा अहवाल महत्त्वपूर्ण भाष्य करताना दिसतो आहे. 32 % महिला कमवत्या आहेत, तसेच 71 % घरांमध्ये पती – पत्नी दोघेही सहमतीने निर्णय घेतात, या बाबी अहवालामुळे विशेषत्वाने अधोरेखित झाल्या आहेत. भारतातला हा फार मोठा सामाजिक बदल घडताना दिसतो आहे. Women – towards gender equality; 82% of women can directly refuse their husband for sex

– महिला – पुरुष संबंधात मोकळेपणा

 •  देशातील विवाहित महिला आपल्या पतीला लैंगिक संबंध ठेवण्यास थेट नकार देऊ शकतात. नकार देण्याचे हे प्रमाण आणि त्याची आकडेवारी लक्षणीय आहे. तब्बल 82 % टक्के विवाहित महिला या आपल्या पतीला शारीरिक संबंध ठेवण्याबाबत नकार देण्यास सक्षम असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 •  पत्नी थकली असेल आणि तिने संबंधास नकार दिला, तर ते रास्त कारण समजून ते प्रामाणिकपणे स्वीकारले पाहिजे, असे मत 66 % पुरुषांनी नोंदविले आहे.
 •  विवाहत महिलांपैकी 32 % महिला नोकरी अथवा स्वतंत्र काम करतात. हे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत एक तृतीयांश आहे.
 •  5 पैकी 4 स्त्रिया या आपल्या पतीला लैंगिक संबंध ठेवायचे नसल्यास नकार देण्यास सक्षम
  गोव्यात अशा महिलांचे प्रमाण जवळपास 92 %. जम्मू काश्मीरमध्ये हेच प्रमाण 65 %. अरुणाचल प्रदेशात 63 % महिला नकार देण्यास सक्षम
 •  दोन टप्प्यांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलं. 17 जून 2019 पासून 30 जानेवारी 2020 पर्यंत एकूण 17 राज्यात या सर्वेक्षणाचा पहिला टप्पा पार पडला. त्यानंतर 2 जानेवारी 2020 पासून 30 एप्रिल 2021 पर्यंत एकूण 11 राज्यात आणि तीन केंद्रशासित प्रदेशात याबाबतचं सर्वेक्षण केले.
 •  या सर्वेक्षणात पुरुषांना चार पर्याय देत पत्नीसोबतच्या लैंगिक संबंधांबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. पत्नीनं जर लैंगिक संबंधास नकार दिला, तर त्यावर कशा पद्धतीने पुरुष प्रतिक्रिया व्यक्त करू शकतात, याचे उत्तरादाखल चार पर्याय देण्यात आले होते.
 •  चार पर्याय कोणते?

 प्रश्न : पत्नीनं लैंगिंक संबंधास नकार दिल्यास, त्यावर पुढीलपैकी कोणत्याप्रकारे रिएक्ट व्हाल?

 •  रागावणे आणि तिला फटकारणे
 •  पैसे किंवा आर्थिक मदत नाकारणे
 •  बळाचा वापर करत पत्नीच्या इच्छेविरुद्ध संबंध ठेवणे
 •  दुसऱ्या स्त्रीसोबत लैंगिक संबंध ठेवणे
 •  15 ते 49 वयोगटातील पुरुषांनी याबाबत आपली मते नोंदवली होती. यातील 72 % पुरुषांना देण्यात आलेले चारही पर्याय मान्य नव्हते. तर 6 % पुरुषांना चारही पर्याय मान्य होते.
 •  जवळपास सर्व राज्यात चारही पर्याय मान्य नसलेल्या पुरुषांची संख्या ही 70 % हून अधिक नोंदवली गेली होती.
 •  पंजाब, कर्नाटक आणि लडाखमध्ये हे प्रमाण 50 % पेक्षाही कमी असल्याचेही निरीक्षण आहे.
 •  पंजाबमध्ये 21 % पुरुषांना चारही पर्याय योग्य वाटले, चंदीगडमध्ये 28 %, कर्नाटकमध्ये 45 % तर लडाखमध्ये 46 % पुरुषांना चारही पर्यांय योग्य वाटले.
 •  अर्थात भारतीय फौजदारी कायद्यानुसार विवाहाअंतर्गत बलात्कार अशा स्वरूपाच्या नोंदी यात नाहीत.
 •  काम करणाऱ्या महिलांची संख्या वाढली

गेल्या वेळच्या तुलनेत यंदा काम करणाऱ्या विवाहित महिलांची टक्केवारी वाढली आहे. पण हे प्रमाण अत्यंत अल्प आहे. अवघ्या एका टक्क्याने विवाहीत महिलांची काम करण्याची टक्केवारी वाढली आहे. या आधीच्या अहवालात 31 % विवाहीत महिला काम करत होत्या. तर यंदाच्या अहवालात ही आकडेवारी आता 32 % पोहोचली आहे.

 •  71 % महिलांच्या मते घरातील निर्णय पत्नीच्या संमतीने घेतले जातात. तर 66 % पुरुषांच्या मते पती – पत्नी मिळून निर्णय घेतात.
 •  21 % महिलांच्या मते नवराच सगळे निर्णय घेतो. तर 28 % पुरुषांच्या मते घरातील निर्णय नवराच घेतो.
 •  32 % विवाहित महिला कमावत्या आहेत. तर 14 % महिलांना खर्च कुठे होते, याचीही कल्पना नसते.
 •  56 % महिलांना बाजारात जाण्याची, फिरण्याची मुभा.
 •  5 % टक्के महिलांना बाजारात किंवा गावाबाहेर किंवा बाहेर कुठेच जाण्याची परवानगी नाही.

भारताच्या लोकशाही व्यवस्थेत स्त्री – पुरुष समानता आणि महिलांना असलेले अधिकार याविषयीचे ठळक भाष्य हा अहवाल करताना दिसतो. महिलांना कोणतेही स्वातंत्र्य नाही इथपासून ते 32 % महिला आता कमावत्या आहेत. 71 % घरांमध्ये पत्नीच्या संमतीने निर्णय घेतले जातात, तसेच 66 % घरांमध्ये पती आणि पत्नी आणि एकमेकांच्या संमतीने मिळालेले ही बाब विशेष लक्षणीय ठरली आहे.

Women – towards gender equality; 82% of women can directly refuse their husband for sex

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*  दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात