केंद्राची खुशखबर : लवकरच वाढणार पेन्शन आणि निवृत्तीचे वयही!!; सरकारची योजना!!


प्रतिनिधी

नवी दिल्ली : सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच केंद्र सरकार खुशखबर देण्याच्या बेतात आहे. कर्मचार्‍यांचे निवृत्तीचे वय आणि पेन्शनची रक्कम वाढविण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे. Pension and retirement age to increase soon !!; Government’s plan

सरकारी कामात तंत्रज्ञानाचा वाढता वापर बदललेले तंत्र आणि कौशल्य विकास यावर आधारित आर्थिक सल्लागार समितीने निवृत्तीचे वय आणि पेन्शन वाढविण्याचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवला आहे.

यामध्ये देशातील लोकांची काम करण्याची वयोमर्यादा वाढवण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे. यासोबतच पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने असेही सांगितले की, देशात निवृत्तीचे वय वाढवण्यासोबतच युनिव्हर्सल पेन्शन सिस्टीमही सुरू करण्यात यावी. आर्थिक सल्लागार समितीच्या अहवालानुसार, या सूचनेनुसार कर्मचाऱ्यांना दरमहा किमान 2000 रुपये पेन्शन देण्यात यावे. या समितीने देशातील ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी उत्तम व्यवस्था करण्याची देखील शिफारस केली आहे.

– कौशल्य विकास आवश्यक

काम करण्याचे वय वाढवायचे असेल तर निवृत्तीचे वय वाढवण्याची नितांत आवश्यकता असल्याचे या अहवालात म्हटले आहे. तसेच सामाजिक सुरक्षा व्यवस्थेवरील दबाव कमी करण्यासाठी हे केले जाऊ शकते. या अहवालात ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींच्या कौशल्य विकासाबाबतही आवर्जून उल्लेख करण्यात आला आहे.

– कौशल्य विकासाची व्याप्ती वाढवावी

केंद्र आणि राज्य सरकारने अशी धोरणे तयार करावीत जेणेकरून कौशल्य विकास होण्यास मदत होईल, असे या अहवालात म्हटले आहे. या प्रयत्नात असंघटित क्षेत्रात राहणारे, दुर्गम भागात राहणारे, निर्वासित, स्थलांतरित ज्यांच्याकडे प्रशिक्षण घेण्याचे कोणतेही साधन नाही अशा लोकांचाही समावेश व्हायला हवा, पण त्यांना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे.

Pension and retirement age to increase soon !!; Government’s plan

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात