विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : लोकसभा सचिवालयाने 17 व्या लोकसभेच्या आठव्या अधिवेशनाचे वेळापत्रक आणि कालावधी जाहीर केला आहे. या संदर्भात शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीनुसार, लोकसभेचे आठवे अधिवेशन 31 जानेवारी 2022 पासून सुरू होणार आहे. 8 एप्रिल रोजी त्याची सांगता होण्याची शक्यता आहे.Parliament’s 8th session begins from 31 January
राष्ट्रपती रामनाथ कोविंद 31 जानेवारीच्या सकाळी संसदेच्या दोन्ही सभागृहांना (लोकसभा आणि राज्यसभा) एकाच वेळी संबोधित करतील, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. याशिवाय 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. (Central budget will be produced in Parliament on 1 st February)
मंत्रालये/विभागांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी आणि त्यांचे अहवाल तयार करण्यासाठी स्थायी समित्यांना वेळ देण्यासाठी, सभागृहाचे कामकाज 11 फेब्रुवारी रोजी तहकूब केले जाईल आणि 14 मार्च रोजी पुन्हा सुरु होणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App