तालिबानी सरकारच्या सैन्य तुकडीचे नाव ‘पानिपत’ भारताला चिथावणी देण्याचा प्रयत्न


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : एकीकडे भारत अफगाणिस्तानला मदत करण्यासाठी औषधे, रसद यांसारख्या गोष्टी पाठवत आहे, तर दुसरीकडे तिथले तालिबान सरकार भारताला चिथावणी देण्याचा प्रयत्न करत आहे. अफगाणिस्तानने आपल्या एका सैन्य तुकडीचे नाव ‘पानिपत’ ठेवल्याचे समोर आले आहे. भारताला चिथावणी देण्याचा प्रयत्न म्हणून याकडे पाहिले जात आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, पानिपत ऑपरेशनल युनिट अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील प्रांत नांगरहारमध्ये तैनात केले जाईल. Panipat, the name of the Taliban’s military unit Attempt to provoke India

किंबहुना, गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतला होता, अमेरिकन सैन्य तिथून माघार घेत असताना हे सर्व घडले. तेव्हापासून तिथे तालिबानची सत्ता आहे. ते सरकार मनमानी निर्णय घेत आहे. मात्र, आतापर्यंत कोणत्याही देशाने तालिबान सरकारला अधिकृत मान्यता दिलेली नाही.



सैन्य तुकडीचे नाव पानिपत का ठेवले?

1761 मध्ये पानिपतची तिसरी लढाई झाली. या युद्धात अफगाण शासक अहमद शाह दुर्रानी याने मराठ्यांचा पराभव केला. त्यामुळेच या ऐतिहासिक घटनेवर अफगाणिस्तान राजकारण करून भारताला चिथावणी देण्याचा प्रयत्न करत आहे.

अफगाणिस्तानच्या अमेज न्यूजने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘पानिपत ऑपरेशनल युनिट’ देशाच्या पूर्वेकडील नांगरहार प्रांतात तैनात केले जाईल. हा प्रांत पाकिस्तानच्या सीमेला लागून आहे. ट्विटमध्ये एक फोटो शेअर करण्यात आला आहे. यामध्ये एक सैनिक गणवेशात दिसत आहे. सैनिकांच्या हातात अमेरिकन रायफल आहे.

दुर्राणीची कहाणी मशिदींमध्ये सांगितली जाते

तालिबान्यांकडून अफगाणिस्तानातील लोकांच्या मनात भारताविरुद्ध द्वेष निर्माण केला जातो. अफगाणिस्तानातील तालिबान सरकार मुस्लिमांना पाठिंबा देण्यासाठी अहमद शाह दुर्रानी यांच्या कथा लोकांना सांगते असे काही अहवाल समोर आले आहेत. या लोकांना मशिदींमध्ये पानिपताच्या युद्धाबद्दल सांगितले जाते. पानिपतची कथा काश्मीरपासून पॅलेस्टाईनपर्यंत प्रसिद्ध होती असे म्हणतात.

Panipat, the name of the Taliban’s military unit Attempt to provoke India

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात