अबब…कमालच आहे !न्यूझीलंडच्या संघाला सुरक्षा पुरवणाऱ्या पाकिस्तानी सुरक्षारक्षकांनी गट्टम केली २७ लाखांची बिर्याणी

विशेष प्रतिनिधी

लाहोर : १७ सप्टेंबर रोजी पहिल्या एकदिवसीय सामन्यातील पहिला चेंडू टाकण्यास काही तासांचा अवधी असताना न्यूझीलंड क्रिकेट संघाने पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला.Pakistan security personnel deployed for New Zealand consumed biryani worth Rs 2.8 million: Reports

त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) हा एकतर्फी निर्णय असल्याची टीका केली आहे. पहिला एकदिवसीय सामना रावळपिंडी स्टेडियमवर वेळेवर चालू झाला नाही. दोन्ही संघ हॉटेलमध्येच थांबले होते. शनिवारी न्यूझीलंडचा संघ मायदेशी परतला.न्यूझीलंडचा संघ १८ वर्षांनंतर पाकिस्तान दौऱ्यावर तीन एकदिवसीय आणि पाच टी-२० सामन्यांची मालिका खेळणार होता. न्यूझीलंडने ही माघार घेतल्यानंतर यावरुन दोन्ही देशांमध्ये बराच वाद झाला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने न्यूझीलंडच्या संघावर चांगली आगपाखड केल्यामुळे नवीन वाद निर्माण झाला. पण आता त्यानंतर याच मालिकेसंदर्भातील एक नवीन वाद समोर आला आहे.

याबाबत पाकिस्तानमधील वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार न्यूझीलंड संघाच्या पाकिस्तान दौऱ्यासाठी तैनात करण्यात आलेल्या सुरक्षारक्षकांवर झालेल्या खर्चासंदर्भातील धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. दौरा रद्द करुन मायदेशी परतलेला न्यूझीलंडचा संघ आठ दिवस पाकिस्तानमध्ये होता.

न्यूझीलंडच्या संघाला या आठ दिवसाच्या कालावधीमध्ये सुरक्षा पुरवणाऱ्या सुरक्षारक्षकांनी तब्बल २७ लाखांची बिर्याणी खाल्ल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानमधील २४ न्यूज एचडीटीव्ही नावाच्या एका वृत्तवाहिनीने हा दावा केला आहे.

या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार इस्लामाबादमधील सेरेना हॉटेलमध्ये न्यूझीलंडचा संघ आठ दिवस मुक्कामी होता. संघाच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी कॅपीटल टेरेटरी पोलीस फोर्स तैनात करण्यात आली होती. या हॉटेलला सुरक्षा पुरवण्यासाठी ५०० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेले.

या पोलिसांसाठी आठ दिवसाचा खाण्याचा खर्च हा तब्बल २७ लाख रुपये एवढा आल्याचा दावा वृत्तवाहिनीने केला आहे. सुरक्षेमध्ये तैनात असणारे हे पोलीस कर्मचारी दिवसातून दोन वेळा बिर्याणीचे जेवण करायचे अशी माहिती देण्यात आली आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा आर्थिक व्यवहार पाहणाऱ्या विभागाकडे सुरक्षारक्षकांच्या खाण्यासंदर्भातील बिल आल्यानंतर या खर्चासंदर्भातील खुलासा झाला. तपासादरम्यान एवढ्या मोठ्या रक्कमेचे बील पाहून हे बील न देण्याचा तात्पुरता निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकरणाची आता चौकशी सुरु आहे.

Pakistan security personnel deployed for New Zealand consumed biryani worth Rs 2.8 million: Reports

महत्त्वाच्या बातम्या