आपल्या देशासाठी खेळणे आणि संघाला विजय मिळवून देण्यासाठी जिवाचे रान करणे हे बालपणी बॅट हातात घेणाऱ्या प्रत्येक मुलाचे स्वप्न असते. पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवाननेही असेच उदाहरण मांडले आहे. उपांत्य फेरीच्या सामन्याच्या रात्री रिझवानला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जेव्हा पाकिस्तान संघाला त्याची सर्वाधिक गरज होती तेव्हा त्याने आपली प्रकृती बाजूला ठेवली. फुप्फुसाच्या संसर्गामुळे रुग्णालयात पोहोचलेला रिजवान देशाची जर्सी घालून मैदानात उतरला, जणू काही त्याला काही झालेच नाही. Pakistan Mohammad Rizwan spent two nights in ICU before T20 World Cup semi-final
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : आपल्या देशासाठी खेळणे आणि संघाला विजय मिळवून देण्यासाठी जिवाचे रान करणे हे बालपणी बॅट हातात घेणाऱ्या प्रत्येक मुलाचे स्वप्न असते. पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवाननेही असेच उदाहरण मांडले आहे. उपांत्य फेरीच्या सामन्याच्या रात्री रिझवानला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जेव्हा पाकिस्तान संघाला त्याची सर्वाधिक गरज होती तेव्हा त्याने आपली प्रकृती बाजूला ठेवली. फुप्फुसाच्या संसर्गामुळे रुग्णालयात पोहोचलेला रिजवान देशाची जर्सी घालून मैदानात उतरला, जणू काही त्याला काही झालेच नाही. बाबर आझमच्या या जोडीदाराने उपांत्य फेरीच्या सामन्यात कांगारू गोलंदाजांची जोरदार धुलाई केली आणि 67 धावांची शानदार खेळीही खेळली. मात्र, गोलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे संघाचे अंतिम फेरीत पोहोचण्याचे स्वप्न साकार होऊ शकले नाही.
His side could not clinch a victory but it was a heroic effort by Mohammad Rizwan 👏#T20WorldCup https://t.co/vaZaB2Mglg — ICC (@ICC) November 11, 2021
His side could not clinch a victory but it was a heroic effort by Mohammad Rizwan 👏#T20WorldCup https://t.co/vaZaB2Mglg
— ICC (@ICC) November 11, 2021
याबाबत खुलासा करताना पाकिस्तान संघाचे फलंदाजी प्रशिक्षक मॅथ्यू हेडन म्हणाले, ‘मोहम्मद रिझवान या सामन्याच्या आदल्या रात्री फुप्फुसाच्या संसर्गामुळे रुग्णालयात होता. तो एक योद्धा आहे. या संपूर्ण स्पर्धेत त्याची कामगिरी अप्रतिम राहिली असून त्याच्याकडे खूप धैर्य आहे. एवढी मोठी झुंज देऊन मैदानात उतरल्याचे क्षणभरही रिजवानने मैदानावरील कोणालाही वाटू दिले नाही. तसेच त्याच्या खेळात कोणतीही कमतरता नव्हती. उपांत्य फेरीच्या सामन्यात कर्णधार बाबर आझमसह रिझवानने संघाला चांगली सुरुवात करून दिली आणि पहिल्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी केली. रिझवानने 52 चेंडूत 67 धावांची दमदार खेळी खेळली, ज्यामुळे संघाला 20 षटकांत 176 धावांपर्यंत मजल मारता आली.
मोहम्मद रिझवानने UAE आणि ओमानच्या भूमीवर खेळल्या गेलेल्या विश्वचषकातील 6 सामन्यांमध्ये 70.25च्या प्रभावी सरासरीने आणि 127.73 च्या स्ट्राइक रेटने 281 धावा केल्या. भारताविरुद्ध पाकिस्तानच्या १० गडी राखून विजय मिळवण्यात यष्टीरक्षक-फलंदाजाने आपला कर्णधार बाबर आझमला पूर्ण पाठिंबा दिला. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी शेवटच्या दोन षटकांत 22 धावांची गरज होती, पण मॅथ्यू वेडने स्फोटक फलंदाजी करत शाहीन आफ्रिदीच्या 19व्या षटकात सलग तीन षटकार मारून सामना संपवला. ९६ धावांत पाच विकेट्स गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाला एका क्षणी संघर्ष करावा लागला होता, पण त्यानंतर मार्कस स्टॉइनिस आणि मॅथ्यू वेड यांच्यातील ८१ धावांच्या तुफानी भागीदारीने पाकिस्तानचा विजय हिरावून घेतला. स्टॉइनिसने 31 चेंडूत 40 आणि अवघ्या 17 चेंडूत 41 धावा फटकावत संघाच्या विजयाचा हिरो ठरला. डेव्हिड वॉर्नरनेही आघाडीच्या फळीत 30 चेंडूत 49 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App