पाकिस्तान विसरले की भारतात मनमोहन नाही मोदी सरकार आहे, सर्जीकल स्ट्राईकवरून अमित शाह यांचा टोला


विशेष प्रतिनिधी

ग्रेटर नोएडा: पुलवामा आणि उरी हल्यानंतर भारत काहीही करणार नाही असे पाकिस्तानला वाटत होते. ते विसरले होते की भारतात मनमोहन सरकार नाही तर मोदी सरकार आहे, अशा शब्दांत सर्जीकल स्ट्राईकवरून अमित शाह यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना टोला लगावला.Pakistan has forgotten that there is no Manmohan Singh government in India, Amit Shah on surgical strike

उत्तर प्रदेशात निवडणुकीच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही प्रचाराचा धडाका लावला आहे. शाह यांनी गौतम बुद्धनगरात डोअर टू डोअर प्रचार केला तर ग्रेटर नोएडा येथील शारदा विद्यापीठात मतदार संवाद कार्यक्रमातही सहभाग घेतला.



यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी पाकिस्तानवरच्या सर्जिकल स्ट्राइकचा उल्लेख करत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना टोला लगावला. केंद्रातील मोदी सरकारने वेळोवेळी घेतलेल्या कणखर भूमिकेबद्दल सांगताना ते म्हणाले, पुलवामा आणि उरी हल्ल्यानंतर भारत काय करणार, असा पाकिस्तानचा समज झाला होता.

भारतात मनमोहन सिंग यांचेच सरकार आहे असे पाकिस्तानला वाटले होते. येथे आता मोदी सरकार आहे याचा विसर त्यांना पडला होता. हा त्यांचा समज आम्ही दूर केला आणि त्यांना अद्दल घडवली. दहशतवादी हल्ल्यानंतर अवघ्या दहा दिवसांच्या आत पाकिस्तानवर सर्जिकल स्टाइक करत आपल्या जवानांनी बदला घेतला. हे धाडस केवळ मोदींचे सरकारच करू शकते.

शाह म्हणाले, केंद्रात काँग्रेसचे सरकार होते तेव्हा त्यांना सपा-बसपाचा पाठिंबा होता. त्यांच्या काळात राजरोस दहशतवादी हल्ले व्हायचे. आपल्या जवानांचे शीर नेण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती तरी दिल्लीला त्याचे काहीच सोयरसुतक नसायचे. तो काळ आता संपला आहे. आता शत्रुला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे

पंतप्रधान मोदी यांनी कलम ३७० हटवण्याचे आणि ३१ ए उखडून फेकण्याचे ऐतिहासिक काम केले असताना याच काँग्रेस, सपा-बसपाने त्याला विरोध केला होता. काश्मीरमध्ये दगड तर सोडाच साधा खडा फेकून मारण्याचीही कुणाची हिंमत आता होणार नाही, असे शहा यांनी बजावले. भारत ही काही धर्मशाळा नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

उत्तर प्रदेशातील ‘बाहुबली’ नेत्यांवर भाजप सरकार कारवाई करत असेल तर त्याने अखिलेश यादव यांच्या पोटात दुखण्याचे कारण काय? असा सवाल करत अमित शाह म्हणाले, सत्तेत असताना जे वीज देऊ शकले नाहीत ते आता मोफत वीज देण्याची आश्वासने देत आहेत. यावर जनता विश्वास ठेवणार नाही. योगींनी पाच वर्षे स्वच्छ शासन चालवलं. सरकारवर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही. त्यांच्यावर राहुल गांधी वा अखिलेश यादव हेसुद्धा याबाबत आरोप करू शकणार नाहीत.

Pakistan has forgotten that there is no Manmohan Singh government in India, Amit Shah on surgical strike

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात