कॉँग्रेसच्या काळातच पाकिस्तान आणि चीन दोनदा एकत्र आले, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राहूल गांधींना फटकारले


विशेष प्रतिनिधी

लखनऊ : भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण करण्यासाठी पाकिस्तान आणि चीन दोनदा एकत्र आले आणि दोन्ही प्रसंगी काँग्रेस सत्तेत होती, अशा शब्दांत कॉँग्रेसचे खासदार राहूल गांधी यांना फटकारत केवळ भाजपच देशाचे रक्षण करू शकते असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी सांगितले.Pakistan and China came together during the Congress era, Defense Minister Rajnath Singh slammed Rahul Gandhi

उत्तर प्रदेशातील निवडणूक सभेत बोलताना राजनाथ सिंह यांनी तपशीलवार कॉँग्रेसच्या काळात कशा प्रकारचे संरक्षणाशी तडजोड केली गेली याचा लेखाजोखाच मांडला. ते म्हणाले, जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना पाकिस्तानने शक्सगाम खोरे चीनला सुपूर्द केले होते.नंतर इंदिरा गांधी पंतप्रधान असताना पाकव्याप्त काश्मीरमधून काराकोरम महामार्ग बांधण्यात आला. त्यानंतर पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर सुरू झाला. त्यावेळी नरेंद्र मोदी पंतप्रधान नव्हते तर मनमोहन सिंग होते. माजी पंतप्रधानांवर टीका करण्याची आपली इच्छा नाही

. ते एक आदरणीय पद असल्याने मला माजी पंतप्रधानांबद्दल बोलायचे नाही. मी त्यांच्याबद्दल कधी वाईटही बोललो नाही. पण मला वस्तुस्थिती लोकांसमोर ठेवायची आहे.राजनाथ सिंह म्हणाले, जोपर्यंत भाजप सत्तेत आहे तोपर्यंत आम्ही आमच्या भारत मातेला कमी पडू देणार नाही. भाजप हा एकमेव पक्ष आहे जो या देशाचे रक्षण करू शकतो आणि त्याला सुरक्षित ठेवू शकतो.

लोकसभेतील भाषणात भाजप सरकारच्या परराष्ट्र धोरणावर टीका करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टीका केली होती. भारताने पाकिस्तान आणि चीनला एकत्र येऊ दिले, जे धोक्याचे बनले आहे, असा आरोप त्यांनी केला होता. भाजपच्या राजवटीत देशाच्या सीमा सुरक्षित आहेत

या मुद्द्याकडे लक्ष वेधण्यासाठी, मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारच्या मागील कार्यकाळात गृहखाते सांभाळणाऱ्या सिंग यांनी उरी आणि पुलवामा हल्ल्यांनंतर भारताने पाकिस्तानवर कसा प्रत्युत्तर केला होता, याची आठवण करून दिली. पुलावामा हल्यानंतर पंतप्रधानांनी बैठक घेतली आणि 10 मिनिटांत निर्णय घेण्यात आला. आमच्या हवाई दलाने सीमा ओलांडून चोख प्रत्युत्तर दिले, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशातील यापूर्वीच्या सर्व गैर-भाजप सरकारांच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आणि घोटाळे होते. त्यांचे मंत्री तुरुंगात गेले. पण भाजप सरकारवर यापूवीर्ही घोटाळ्याचे कोणतेही आरोप झाले नाहीत असे सांगून राजनाथ सिंह म्हणाले, लोकांनी आपली निवडणूक शहाणपणाने करावी.

तुम्ही याचा विचार करा. लक्ष्मी (समृद्धीची देवी) हत्तीवर स्वार होऊन येते का? ती सायकल चालवते का? तर नाही देवी लक्ष्मी कमळावर विराजमान आहे. तुम्ही लक्षात ठेवा की तुमच्या घरांमध्ये देवी लक्ष्मी मोफत गॅस कनेक्शन, पाईप कनेक्शन आणि वीज जोडणीच्या रूपात येते.

Pakistan and China came together during the Congress era, Defense Minister Rajnath Singh slammed Rahul Gandhi

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण