कोरोनाच्या संकटात रुग्णांची सेवा हिच प्रभू रामचंद्रांची सेवा मानून श्री राम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टनेही रुग्णसेवेच्या कामाची सुरूवात केली आहे. कोरोना रुग्णांची मदत करण्यासाठी ट्रस्ट दोन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणार आहे.Oxygen project to set up by Shri Ram Janmabhoomi Trust
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटात रुग्णांची सेवा हिच प्रभू रामचंद्रांची सेवा मानून श्री राम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टनेही रुग्णसेवेच्या कामाची सुरूवात केली आहे. कोरोना रुग्णांची मदत करण्यासाठी ट्रस्ट दोन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणार आहे.
अयोध्येतील भव्य श्री राम मंदिराच्या उभारणीसाठी श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. अयोध्येतील मंदिर आणि इतर विकासाच्या कामांसाठी ट्रस्टने निधीही जमा केला आहे. या निधीतूनच आता कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहे.
श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, कोरोनाच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर अयोध्या जिल्ह्यातऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी ट्रस्टतर्फे दशरथ मेडीकल कॉलेजमध्ये दोन ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यासाठीचा सर्व खर्च ट्रस्टतर्फे करण्यात येणार आहे.
श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे डॉ. अनिल मिश्र यांनी सांगितलेकी संपूर्ण देश आज कोरोना महामारीच्या संकटात आहे. त्यामुळे ट्रस्टने ५५ लाख रुपये खर्च करून दशरथ मेडीकल कॉलेजमध्ये दोन प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.
महत्वाच्या’ बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App