काहींच्या लाडक्या हार्वडमध्ये काँग्रेसच्या उदयास्ताचा अभ्यास होतोय, पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकसभेत तुफान फटकेबाजी


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : अदानी – हिंडेनबर्गच्या मुद्द्यावरून काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि बाकीच्या विरोधकांनी घेरल्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दिवस होता. त्यांनी आपल्या खास शैलीत लोकसभेत प्रखर भाषण करून तुफान फटकेबाजी करीत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. Over the years an important study has been done at Harvard and the subject of the study is the ‘Rise and fall of India’s Congress Party’: PM Modi

अदानी – हिंडेनबर्ग मुद्द्यावर राहुल गांधींनी भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वारंवार नाव घेऊन त्यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्याला काँग्रेस सह सर्व विरोधकांनीही जोरदार प्रतिसाद दिला होता. या पार्श्वभूमीवर मोदींनी आपली संधी आल्यावर राहुल गांधी आणि सर्व विरोधकांची पूर्ण परतफेड करून घेतली.

पंतप्रधान मोदी म्हणाले, की काहींना हार्वड विद्यापीठाचे फारच प्रेम आहे. कोविड काळात भारत कसा अपयशी ठरेल किंवा ठरला, याचा तिथे म्हणे अभ्यास होईल. पण गेल्या काही वर्षांपासून त्याच तुमच्या लाडक्या हार्वडमध्ये एक अभ्यास आधीपासूनच सुरू आहे आणि अभ्यासाचा विषय आहे, काँग्रेसचा उदयास्त, अशा शब्दांत मोदींनी काँग्रेसला फटका लगावल्यानंतर लोकसभेत सत्ताधारी बाकांवर प्रचंड जल्लोष झाला.

पंतप्रधान मोदी म्हणाले, मी चर्चेत सहभागी झालेल्या सर्व सदस्यांचे आभार व्यक्त करतो. पण मी पाहत होतो काल काही लोकांच्या भाषणानंतर पूर्ण इको सिस्टीम, समर्थक उड्या मारत होते, असा चिमटा मोदींनी काढला. इथे सर्व सदस्यांनी चर्चेत सहभाग घेतला. प्रत्येकाने आपापले आकडे आणि तर्क दिले.आणि आपल्यातील वृत्ती, प्रवृत्तीनुसार आपले म्हणणे मांडले.

आता या गोष्टींना समजण्याचा आम्ही प्रयत्न करतो तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की, कुणाची किती क्षमता आहे, कुणाची किती योग्यता आहे, तसेच कुणाची किती समज आहे आणि कुणाचा काय इरादा आहे. हे सगळे आता सपष्ट होतेच आहे, असा टोला त्यांनी लगावला.

राहुल गांधी यांच्या भाषणाला काल काँग्रेस सदस्यांनी आणि विरोधी सदस्यांनी जसा तुफान प्रतिसाद दिला होता, त्यापेक्षा जास्त प्रतिसाद आज सत्ताधारी पक्षाच्या बाकांवरून पंतप्रधान मोदींच्या भाषणाला मिळाला.

Over the years an important study has been done at Harvard and the subject of the study is the ‘Rise and fall of India’s Congress Party’: PM Modi

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात