तुम्ही विरोधकांबरोबर की भाजप बरोबर??; प्रादेशिक पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर केजरीवालांचे काँग्रेसला आव्हान


वृत्तसंस्था

रांची : केंद्रातील भाजप सरकारने दिल्ली सरकार संदर्भात काढलेल्या अध्यादेशाचा राजकीय वापर करत प्रादेशिक पक्षांचे पक्षांच्या मुख्यमंत्र्यांचे ऐक्य साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आता थेट काँग्रेसलाच आव्हान दिले आहे. देशातली लोकशाही वाचवण्यासाठी तुम्ही विरोधकांबरोबर आहात की भाजपबरोबर हे सिद्ध करायची वेळ आली आहे, अशा शब्दांमध्ये अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेस पक्षाला आव्हान दिले आहे. पण केजरीवालांच्या या आव्हानअस्त्राचे खरे राजकीय इंगित वेगळेच आहे.opposition or BJP??; After meeting the chief ministers of regional parties, Kejriwal challenges the Congress

दिल्लीच्या सरकारचे अधिकार हनन करणारा अध्यादेश केंद्र सरकारने काढल्याचा दावा करून तो राज्यसभेत पराभूत करण्यासाठी केजरीवाल आकाश पाताळ एक करत आहेत. ते स्वतः दिल्ली सोडून आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवा भगवंत मान यांना पंजाबचा कारभार वाऱ्यावर सोडायला लावून त्यांना घेऊन वेगवेगळ्या राज्यांमध्ये फिरत आहेत. त्यातही त्यांनी प्रादेशिक पक्षांचे मुख्यमंत्री असलेली राज्ये निवडली आहेत त्यांनी आत्तापर्यंत बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, त्याचबरोबर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत.



आज ते रांचीत होते. तेथे त्यांनी हेमंत सोरेन यांची भेट घेऊन संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित केले आणि या पत्रकार परिषदेतच त्यांनी काँग्रेसला आव्हान दिले. तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी सर्व विरोधी पक्षांबरोबर आहात की केंद्रातल्या भाजप सरकार बरोबर आहात हे सिद्ध करायची वेळ आली आहे. केंद्र सरकारने लादलेला अध्यादेश पराभूत करण्यासाठी राज्यसभेत विरोधकांची एकजूट हवी आहे. राज्यसभेतल्या 238 जागांपैकी भाजपकडे 93 खासदार आहेत. त्यामुळे बहुमतासाठी त्यांना विरोधकांची गरज लागणार आहे. अशा स्थितीत संबंधित अध्यादेश राज्यसभेत पराभूत होऊ शकतो पण त्यासाठी विरोधी पक्षांच्या एकजुटीची गरज आहे. ही एकजूट साध्य करण्यासाठी काँग्रेस साथ देणार आहे का??, असा सवाल केजरीवाल यांनी या पत्रकार परिषदेत केला आहे.

अरविंद केजरीवाल हे वेगवेगळ्या प्रादेशिक पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना भेटून ऐक्य साधण्याचा प्रयत्न करत असले तरी त्यांचे आणि दिल्लीतल्या काँग्रेस नेत्यांचे अजिबात सख्य नाही. दिल्लीतले काँग्रेस नेते माजी मंत्री अजय माकन आणि माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे चिरंजीव माजी खासदार संदीप दीक्षित यांचा केजरीवाल यांना प्रचंड विरोध आहे. केजरीवाल अध्यादेशाच्या निमित्ताने स्वतःचे कातडी बचावत आहेत. दारू घोटाळ्यातून स्वतःची मान सोडवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पण ते अडकल्याशिवाय राहणार नाहीत, असे शरसंधान अजय माकन यांनी साधले आहे. त्याला संदीप दीक्षित यांनी दुजोरा दिला आहे.

दिल्लीतल्या या काँग्रेस नेत्यांचा विरोध लक्षात घेऊनच केजरीवाल यांनी घायकुतीला येऊन काँग्रेसला लोकशाही वाचवण्याच्या मुद्द्यावर आव्हान दिले आहे. त्यांनी काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या सोनिया गांधी आणि निलंबित खासदार राहुल गांधी यांच्या भेटीची वेळ देखील मागितली आहे. परंतु या दोन्ही नेत्यांनी केजरीवाल यांना अद्याप तरी भेटीची वेळ दिलेली नाही. त्यामुळेच केजरीवाल यांनी त्यांचे आव्हानास्त्रबाहेर काढून त्याला लोकशाही वाचविण्याचा मुलामा दिला आहे.

opposition or BJP??; After meeting the chief ministers of regional parties, Kejriwal challenges the Congress

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात