ऐन सणासुदीच्या काळात महाराष्ट्र आणि देशात आंदोलनाचा भडका उडवायचा विरोधकांचा इरादा

प्रतिनिधी

नवी दिल्ली : सध्या देशभर नवरात्राचा जागर सुरू आहे. कोरोनाच्या निर्बंधांमधून काहीशी शिथिलता मिळून सर्वसामान्य नागरिक सणासुदीचा काळ सुखात कंठायचा म्हणताहेत त्याच वेळी नेमका महाराष्ट्र आणि देशात आंदोलनाचा भडका उडवून द्यायचा विरोधी पक्षांचा इरादा दिसत आहे.Opposition intends to provoke agitation in Maharashtra and the country during Ain Sanasudi

महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीतल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुढाकार घेऊन येत्या 11 तारखेला महाविकास आघाडीचा महाराष्ट्र बंद पुकारला आहे. यामध्ये शिवसेनेचे नेते कशा पद्धतीने सहभागी होतील, यावर महाराष्ट्र बंदचे भवितव्य अवलंबून आहे.तरी देखील आत्तापर्यंत ऐन सणासुदीच्या काळात अशा प्रकारचा बंद राजकीय पक्षाने पाळल्याचे नजीकच्या इतिहासात घडलेले नाही. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र आपल्या “स्वबळा”वर लक्ष केंद्रित करून हा बंद महाविकास आघाडीच्या नावाने यशस्वी करण्याचा मनसूबा ठेवला आहे.

दुसरीकडे देशात दसऱ्याच्या दिवशी रावणाच्या ऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा इरादा संयुक्त किसान मोर्चाने जाहीर केला आहे. 12 तारखेला उत्तर प्रदेशच्या लखीमपूरमध्ये देशभरातल्या शेतकऱ्यांना जमण्याचे आवाहन केले आहे.

त्या तारखेपासून संपूर्ण उत्तर प्रदेशात अस्थिकलश यात्रा काढण्याचा देखील त्यांचा इरादा आहे. या खेरीज 18 सप्टेंबर रोजी संपूर्ण देशात रेल रोको आंदोलन करण्यात येऊन ठिकाणी बंद आणि चक्काजाम करण्याचा करण्याची घोषणा देखील संयुक्त किसान मोर्चाचे नेते राकेश टिकैत आणि योगेंद्र यादव यांनी केली आहे.

एकीकडे सणासुदीच्या काळात देशातील सर्वसामान्य नागरिक कोरोनाच्या निर्बंधांमधून थोडा मोकळा श्वास घेत असताना विरोधक मात्र आंदोलन पेटवून संपूर्ण देशाला वेठीला धरत असल्याचे चित्र यातून तयार झाले आहे.

Opposition intends to provoke agitation in Maharashtra and the country during Ain Sanasudi

महत्त्वाच्या बातम्या