सावरकर – अदानी मुद्द्यांवर फेल; म्हणून पुलवामा मुद्द्यावर विरोधकांचा नवा खेळ!!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : सावरकर – अदानी मुद्द्यांवर फेल; पुलवामा मुद्द्यावर नवा खेळ!!, अशी राजधानी नवी दिल्लीतली आजची राजकीय स्थिती आहे. कारण जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक आणि शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी जुनाच पुलवामा मुद्दा पुन्हा उकरून काढला आहे.Opposition failed on savarkar and adani issues, therefore raising “old” pulwama issue again

द वायर वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वेगवेगळ्या मुद्द्यांवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. पुलवामा मुद्द्यापासून शेतकऱ्यांदोलनापर्यंत त्यांनी मोदींवर घेतलेल्या आक्षेपांची जंत्री वाचून दाखवली आहे. पुलवामा हल्ला केवळ मोदी सरकारच्या चुकीमुळे झाला. जवान आपल्या धोकादायक प्रवासासाठी एअरक्राफ्ट मागत होते. फक्त 3 एअरक्राफ्ट द्यायची होती. पण ती देणे राजनाथ सिंह यांनी नाकारले. ही सगळी बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कानावर घातली. पण त्यांनी त्यावेळी मला गप्प राहायला सांगितले होते, असा गंभीर आरोप सत्यपाल मलिक यांनी केला आहे.



त्याचबरोबर शेतकरी आंदोलनाच्या वेळी 500 शेतकरी मरण पावल्याची बातमी मी त्यांना सांगितल्या बरोबर ते माझ्यासाठी मेलेत का??, असा उर्मट सवाल मोदींनी केला. त्यावरून मोदींशी आपले 5 मिनिटे भांडण झाल्याचेही मलिक यांचे म्हणणे आहे. मलिक यांनी द वायरला दिलेल्या या मुलाखतीनंतर देशभरात पुलवामा मुद्द्यावर राजकीय गदारोळ सुरू झाला आहे.

एरवी महाराष्ट्रातल्या घडामोडींवर भाष्य करण्यासाठी सकाळी 9.00 ला प्रेस कॉन्फरन्स घेणाऱ्या खासदार संजय राऊत यांनी पुलवामा मुद्द्यावरची प्रेस कॉन्फरन्स घेतली. 2019 मध्येच त्यांनी पुलवामा हल्ल्याबाबत काही संशय व्यक्त केले होते. त्याचेच रिपीटेशन त्यांनी आज केले. निवडणुका जवळ आल्या की पाकिस्तानशी संघर्ष करून किरकोळ कारवाई करून मोठा बवाल उभा करायचा आणि निवडणुका जिंकायच्या हा मोदी सरकारचा नेहमीचा डाव आहे, असे शरसंधान संजय राऊत यांनी साधले.

जुन्या भांड्याला नवी कल्हई

पण मूळात सत्यपाल मलिक आणि संजय राऊत यांनी अचानक पुलवामा मुद्दा पुन्हा उकरून काढण्याचे कारणच काय पडले??, याचा थोडा आढावा घेतला, तर विरोधक विशेषत: काँग्रेस सावरकर मुद्द्यावर बॅकफूटवर गेली आणि अदानी मुद्द्यावर फेल झाली, त्यामुळे त्यांना हा नवा मुद्दा उकरून काढवा लागला आहे, असेच दिसून येते. पण पुलवामा हा मुद्दा देखील नवा नसून तो जुन्याच भांड्याला कल्हई करून पेश केला आहे. कारण पुलवामा संदर्भात 2019 च्या निवडणुकीपूर्वी मोदी सरकारमधील अनेक मंत्र्यांनी आणि दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक जाहीर मुलाखतींमध्ये त्याचे स्पष्ट खुलासे केले होते आणि संरक्षण विषयक धोरणात्मक बाबींमध्ये सरकारने कोणते बदल केले आहेत, याची स्पष्टीकरणे दिली होती.

मोदी सरकार मागे हटले नाही

पण आता सावरकर आणि अदानी या दोन्ही मुद्द्यांवर भाजप सरकार मागे हटायला तयार नाही. उलट हे मुद्दे काँग्रेस आणि विरोधकांवरच बॅकफायर झाले. राहुल गांधींना सावरकर मुद्द्यावर तर उद्धव ठाकरेंनी थेट राहुल गांधींना दम भरला त्यानंतर शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने पूर्ण बॅकफूटवर ढकलून दिले. काँग्रेसने त्यावर “तोडगा” काढत शिवानी वडेट्टीवार या ओबीसी महिला नेत्याला पुढे करून सावरकरांची वेगळ्या पद्धतीने बदनामी सुरू केली आहे. पण त्या त्या मुद्द्याची देखील महाराष्ट्रापुरती मर्यादा आहे आणि त्यातही शिवसेना – भाजपची सावरकर गौरव यात्रा जनतेच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने यशस्वी झाल्यानंतर सावरकर मुद्दा काँग्रेससाठी याचा फारसा राजकीय दृष्टीने उपयोगी देखील राहिलेला नाही.

सगळेच मुद्दे बॅकफायर

जे सावरकर मुद्द्याचे त्यापेक्षा थोडे वेगळे अदानी मुद्द्याचे झाले आहे. अदानी मुद्द्यावर शरद पवारांनी वेगळी भूमिका घेऊन राहुल गांधींना बॅकफूटवर ढकलण्याचा प्रयत्न केला खरा. पण ते सावरकर मुद्द्याएवढे यशस्वी झाले नाहीत. राहुल गांधींनी अदानी मुद्दा सोडला नाही. पण राजकीय परिणाम म्हणून त्याचा काँग्रेसला काही उपयोग झाला नाही कारण भाजप सरकार अजिबात नामोहरम झाले नाही. आणि ज्याचा राजकीय परिणाम शून्य असतो तो मुद्दा कितीही उकरला तरी त्यातून विरोधक नामोहरम होण्याऐवजी आपल्यावरच तो बॅकफायर होण्याचा धोका असतो. त्यामुळे मग नवीन मुद्दा शोधून काढला पाहिजे याची जाणीव विरोधकांना झाली आहे. पण नवा मुद्दा लगेच हाती लागत नाही मग करायचे काय??,हा प्रश्न पडल्याने शेवटी पुलवामा मुद्द्याच्या जुन्या भांड्याला कल्हई लावून तो मुद्दा सत्यजित सत्यपाल मलिक आणि संजय राऊत यांच्या मुखातून विरोधकांनी समोर आणला आहे. अर्थात हा विरोधकांच्या पुढील राजकारणाचा बेरकी नमुना म्हणायचा की विरोधकांच्या राजकीय अकलेचे दिवाळी निघालेले म्हणायचे??, हे ज्याचे त्याने ठरवावे!!

Opposition failed on savarkar and adani issues, therefore raising “old” pulwama issue again

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात