प्रशांत किशोरांचा केवळ फार्स, ममता बॅनर्जींनी दिले त्यांच्याच आयपॅक कंपनीला प्रसिध्दीचे कंत्राट, आता देशपातळीवर तृणमूल कॉँग्रेसचे करणार मार्केटिंग


पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉँग्रेसने मोठा विजय मिळविल्यावरही प्रशांत किशोर यांनी आता जनसंपर्काचे काम सोडणार असल्याचे म्हटले होते. मात्र, त्यांचा हा फार्सच असल्याचे स्पष्ट झाले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रशांत किशोर यांच्या आयपॅक कंपनीलाच पुन्हा एकदा प्रसिध्दीचे कंत्राट दिले आहे. त्यामुळे प्रशांत किशोर हे देशपताळीवर तृणमूल कॉँग्रेसचे मार्केटिंग करण्याची शक्यता आहे.Only Farse of Prashant Kishor, Mamata Banerjee gave publicity contract to her own ipac company, will now market Trinamool Congress nationwide


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉँग्रेसने मोठा विजय मिळविल्यावरही प्रशांत किशोर यांनी आता जनसंपर्काचे काम सोडणार असल्याचे म्हटले होते. मात्र, त्यांचा हा फार्सच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रशांत किशोर यांच्या आयपॅक कंपनीलाच पुन्हा एकदा प्रसिध्दीचे कंत्राट दिले आहे. त्यामुळे प्रशांत किशोर हे देशपताळीवर तृणमूल कॉँग्रेसचे मार्केटिंग करण्याची शक्यता आहे.



भारतीय जनता पक्षाला पश्चिम बंगालमध्ये १०० पेक्षा जास्त जागा मिळाल्यास आपण जनसंपर्काचे काम सोडून देऊ असा पण प्रशांत किशोर यांनी केला होता. निवडणुकीत भाजपाला केवळ ७२ जागा मिळाल्या. मात्र, तरीही प्रशांत किशोर यांनी आपण सध्या करत असलेले काम सोडून देणार आहोत.

आयुष्यात काहीतरी वेगळे करायचे आहे. प्रशांत किशोर यांच्या म्हणण्यानुसार ते आता आयपॅकच्या दैनंदिन कामकाजात लक्ष घालणार नाहीत. मात्र, आयपॅक कंपनीचे मुख्य रणनितीकार असलेल्या प्रशांत किशोर यांच्याच कंपनीला ममता बॅनर्जी यांनी कंत्राट दिल्याने प्रशांत किशोर यांचा काम सोडणार म्हणणे हा फार्सच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कारण प्रशांत किशोर यांच्या रणनितीमुळे पश्चिम बंगालमध्ये तृणमूल कॉँग्रेसला मोठा विजय मिळाविला. त्याचबरोबर तामीळनाडूमध्ये द्रविड मुनेत्र कळघम आणि कॉँग्रेस आघाडीलाही विजय मिळाला.आयपॅकने आता नऊ सदस्यांची एक नेतृत्वाची फळी तयार केली आहे.

प्रशांत किशोर खरोखरच आयपॅकचे काम करणार नसतील तर कंपनी कशा पध्दतीने काम करेल आणि या कंपनीचे भविष्य काय असेल हा पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहें. नव्या कंत्राटानुसार पश्चिम बंगालमधील पंचायतींपासून ते स्थानिक स्वराज्य संस्थेपर्यंतच्या सर्व निवडणुकांची जबाबदारी आयपॅककडे देण्यात आली आहे.

पुढील विधानसभा निवडणुकांची जबाबदारीही आयपॅककडेच देण्यात आली आहे. विशेष म्हणजे तृणमूल कॉँग्रेसचे नेते पार्थ चॅटर्जी यांच्या म्हणण्यानुसार, आता तृणमूल कॉँग्रेस केवळ पश्चिम बंगालपुरता मर्यादित राहणार नाही. इतर राज्यांतही आपले भाग्य अजमाविणार आहे. पुढील काळात उत्तर प्रदेश, गुजरात ,कर्नाटका या महत्वाच्या राज्यांच्या निवडणुका आहेत.

तृणमूल कॉँग्रेसच्या देशपातळीवर जाण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणूनच आता प्रशांत किशोर यांच्याकडे पाहिले जात आहे. याच कंत्राटाचा एक भाग म्हणून नुकतीच प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानिमित्ताने ममता बॅनर्जी यांनी धन्यवादाचा निरोप शरद पवार यांच्याकडे पाठविला.

Only Farse of Prashant Kishor, Mamata Banerjee gave publicity contract to her own ipac company, will now market Trinamool Congress nationwide

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात