विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – भारतात गेमिंग ॲप वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लॉकडाऊनच्या काळात यात जास्त वाढ झाल्याचे समोर आले आहे. एका वर्षात गेमिंग ॲप कंपन्यांनी ३७७० कोटी रुपये कमावले आहेत. Online gaming market in India increase rapidly
बॅटल रॉयलवर आधारित पाच मोबाईल गेम्स ॲपनी भारतात १०० मिलियन (७५४ कोटी) डॉलरपेक्षा जास्त कमाई केली. या गेम्सची कमाई दिवसेंदिवस वाढतच आहे. या ॲप्सच्या खरेदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेतही भर पडेल, असे सांगितले जात आहे.
मार्केट रिसर्च आणि कन्सल्टिंग फर्म्स निको पार्टनर्सच्या अनुसार भारतात मोबाईल आणि पीसी गेमिंगचा आशियातील सर्वात मोठा बाजार तयार झाला आहे. येणाऱ्या पाच वर्षांत याची कंपाऊंड अॅन्यूयल ग्रोथ २९.८ टक्के राहील, असा अंदाज आहे. २०२५ पर्यंत याचा रेव्हेन्यू ११ हजार कोटींपर्यंत पोहोचेल. यात रिअल मनी गेम्सच्या रिव्हेन्यूचा अंतर्भाव नाही.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App