converted sikh girls : लव्ह जिहादचा वापर करून धर्मांतरित झालेल्या दोन शीख तरुणींपैकी एक परतली आहे. परतल्यावर तिचे शीख समाजातील तरुणाशी लग्नही लावून देण्यात आले आहे. मुलींच्या धर्मांतराचा प्रकार उजेडात आल्यापासून जम्मू ते दिल्लीपर्यंत राजकारण प्रचंड तापलेले आहे. दुसरीकडे, आता दुसऱ्या तरुणीचा शोध सुरू आहे. या प्रकारामुळे अकाल तख्त प्रशासनाने कडक कारवाईची मागणी केली आहे. शीख नेत्यांनी आता जम्मू-काश्मिरात उत्तर प्रदेशच्या धर्तीवर अँटी लव्ह जिहाद कायद्या आणण्याची जोरदार मागणी केली आहे. one of two converted sikh girls returned and married to sikh youth; Sikh Leaders call for love jihad law in J&K
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : लव्ह जिहादचा वापर करून धर्मांतरित झालेल्या दोन शीख तरुणींपैकी एक परतली आहे. परतल्यावर तिचे शीख समाजातील तरुणाशी लग्नही लावून देण्यात आले आहे. मुलींच्या धर्मांतराचा प्रकार उजेडात आल्यापासून जम्मू ते दिल्लीपर्यंत राजकारण प्रचंड तापलेले आहे. दुसरीकडे, आता दुसऱ्या तरुणीचा शोध सुरू आहे. या प्रकारामुळे अकाल तख्त प्रशासनाने कडक कारवाईची मागणी केली आहे. शीख नेत्यांनी आता जम्मू-काश्मिरात उत्तर प्रदेशच्या धर्तीवर अँटी लव्ह जिहाद कायदा आणण्याची जोरदार मागणी केली आहे.
अकाल तख्तचे अधिकृत जथ्थेदार ग्यानी हरप्रीतसिंग यांनी नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांना पत्र लिहिले आहे. पत्रात त्यांनी काश्मीर खोऱ्यात शीख तरुणींच्या बळजबरी धर्मांतराला आळा घालण्याची मागणी केली आहे. मागच्या एका महिन्यात चार शीख तरुणींचे अपहरण करून बळजबरी धर्मांतर झाल्याचेही ते म्हणाले. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे अध्यक्ष बीबी जागीर कौर म्हणाल्या की, शीख धर्म इतर कुठल्याही धर्मात परिवर्तनाची परवानगी देत नाही.
वृत्तसंस्था पीटीआयने मंगळवारी उशिरा दिलेल्या वृत्तानुसार, परतलेली मुलगी आणि तिचा पती यांना दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधक कमिटीने दिल्लीला हलवले आहे. त्यांच्या सुरक्षेच्या कारणांमुळे हा निर्णय घेण्यात आला. कमिटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “ते जम्मू-काश्मिरात सुरक्षित नव्हते म्हणून आम्ही त्यांची दिल्लीला आणले आहे. दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधक कमिटीद्वारे त्यांना नोकरीही देण्यात आली आहे.”
one of two converted sikh girls returned and married to sikh youth; Sikh Leaders call for love jihad law in J&K
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App