केंद्र सरकारने आधार क्रमांक पॅन क्रमांकाला जोडण्यासाठी पुन्हा एकदा मुदत वाढवली आहे. आता, पॅन क्रमांक आधार क्रमांकाला जोडण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत देण्यात आलीय. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.Once again extension to add to Aadhaar PAN card
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्र सरकारने आधार क्रमांक पॅन क्रमांकाला जोडण्यासाठी पुन्हा एकदा मुदत वाढवली आहे. आता, पॅन क्रमांक आधार क्रमांकाला जोडण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत देण्यात आलीय. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
‘इन्कम टॅक्स इंडिया’ या ट्विटर हॅन्डलवरून एका ट्विटच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली आहे. कोविड १९ संक्रमणादरम्यान नागरिकांना येणाºया अडचणी लक्षात घेता आधार क्रमांक पॅन क्रमांकाला जोडण्यासाठी मुदत वाढविली जात आहे.
३१ मार्च २०२१ ऐवजी आता ३० जून २०२१ पर्यंत नागरिकांना कोणत्याही शुल्काशिवाय किंवा दंडाशिवाय आधार क्रमांक पॅन क्रमांकाला जोडता येणार आहे.कोणत्याही दंडाशिवाय आधार आणि पॅन क्रमांक एकमेकांना लिंक करण्याचा शेवटचा दिवस असल्यानं नागरिकांची सरकारी अधिकृत वेबसाईटवर एकच झुंबड उडाली होती. एकाच वेळी अनेक युझर्सनं लॉग इन केल्यानं आयकर विभागाचा सर्व्हर डाऊन झाला होता.
त्यामुळे वेबसाईटवर आलेल्या नागरिकांच्या पदरी निराशाच पडली. परंतु, उद्या याच कामासाठी १००० रुपयांचा भुर्दंड भरावा लागणार असं वाटत असताना आयकर विभागाकडून पुन्हा एकदा नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
यापूर्वीही केंद्राकडून आधार आणि पॅन क्रमांक लिंक करण्यासाठी अनेकदा मुदतवाढ दिली गेली होती. गेल्या मंगळवारी २३ मार्च २०२१ रोजी लोकसभेत ‘वित्त विधेयक २०२१’ संमत करण्यात आलं. यामध्ये ‘आयकर कायदा १९६१’ मध्ये नव्या कलम २३४ एच नुसार याविषयीची तरतूद करण्यात आलीय.
यानुसार, पॅन क्रमांक आधारला लिंक नसेल तर व्यक्तीला १००० रुपयांपर्यंतच दंड ठोठावला जाऊ शकतो. याशिवाय त्या व्यक्तीला पॅन क्रमांक अवैध घोषित झाल्यामुळे इतर अडचणींचा सामनाही करावा लागू शकतो.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App