विशेष प्रतिनिधी
भोपाळ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बुलडोझर कारवाईमुळे गुन्हेगारांवर जरब बसली. कायदा आणि सुव्यवस्थेत सुधारणा झाली. उत्तर प्रदेशातील जनतेने यामुळेत्यांना पुन्हा एकदा पसंती दिली आहे. आता याच मार्गावर आता मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहानही आहेत. भोपाळमध्ये निघालेल्या बुलडोझरच्या परेडने त्याची झलक दाखवून दिली.On the path of Yogi Aaditynath , Shivrajmam strikes criminals,Bulldozer parade on Bhopal roads.
शिवराजसिंह चौहान सध्या अॅक्टीव्ह मोडवर आहेत. मध्य प्रदेशातही गुन्हेगारीचा नि:पात करण्यासाठी त्यांनी बुलडोझर फंडा वापरण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाºयांची बैठक घेऊन त्यांना मुख्यमंत्र्यांनी कठोर इशारा दिला आहे. सरकार आमच्या मजीर्ने चालेल, कोणाला अडचण असल्यास सांगावे. निदेर्शांचे पालन केले जावे,असे त्यांनी बजावले आहे.
त्याचा प्रत्यय राजधानी भोपाळ येथे आला. भोपाळमधून १५ बुलडोझरची परेड निघाली होती. गुन्हेगारांची गय केली जाणार नाही, असा कठोर संदेश देण्याच्या उद्देशाने बुल्डोझरची परेड झाली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समाजकंटक, विशेषत: अत्याचाराचे आरोपी, माफियांची घरे जमीनदोस्त करण्यासाठी बुल्डोझर्सचा वापर केला होता. त्याच धर्तीवर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही कारवाईचे आदेश दिलेआहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App