Congress : एकीकडे पक्ष सोडणाऱ्या नेत्यांविषयी “अचिंता”; दुसरीकडे भविष्यावर डोळा ठेवून चिंतन!!


काँग्रेसच्या उदयपूर चिंतन शिबिरात दुसऱ्या दिवशी ज्या वेळी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर राहुल गांधींना विराजमान करण्याचा आग्रह धरण्यात येईल तेव्हा एकीकडे पक्ष सोडणाऱ्या नेत्यांविषयी “अचिंता” तर दुसरीकडे भविष्य वर डोळा ठेवून चिंतन ही बाब पुन्हा एकदा अधोरेखित होईल. On the one hand, “unconcern” about leaders leaving the party; On the other hand, keep an eye on the future

पंजाबचे काँग्रेसचे एकेकाळचे प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांनी काँग्रेसच्या उदयपूर चिंतन शिबिराचा राजकीय मुहूर्त साधत पक्षाला रामराम ठोकला. आपण कोणतेही पद भूषवत नसताना आपल्याला शिस्तभंगाची शो कॉज नोटीस देण्यात आली असे त्यांचे म्हणणे होते. यासाठी त्यांनी अर्थातच गांधी परिवाराला दोष दिला. त्यांच्या पक्ष सोडण्यावर माजी कायदामंत्री अश्विनीकुमार यांनी चिंता व्यक्त केली. आज सुनील जाखडे यांनी पक्ष सोडला आहे.


Rahul Gandhi : राहुल गांधींची काठमांडूत चिनी राजदूत हाऊ यान्की बरोबर टुंगरपार्टी!!


उद्या त्यांच्या पाठोपाठ अनेक नेते असेच काँग्रेस बाहेर पडतील. कारण त्यांना सन्मान मिळत नाही, अशी चिंता अश्विनी यांनी व्यक्त केली. राहुल गांधींच्या गुजरात मधल्या दाहोद रॅलीमध्ये ज्या हार्दिक पटेलांची नाराजी चिंता दूर झाली होती, ती चिंता उदयपूर चिंतन शिबिराच्या वेळी पुन्हा एकदा उफाळून आली.

पण या सगळ्या वरिष्ठ आणि तरुण नेत्यांच्या चिंतेवर “अचिंता” व्यक्त करीत म्हणजे त्या चिंतेकडे कडे पूर्णपणे दुर्लक्ष करत काँग्रेसच्या नेत्यांचे भविष्यावर डोळा ठेवून चिंतन सुरू आहे. काँग्रेसच्या अध्यक्षपदावर राहुल गांधींना विराजमान करण्यामध्ये खुद्द त्यांच्या पेक्षा इतर काँग्रेस नेत्यांचे भविष्य दडलेले आहे, तसेच काँग्रेसपुढे ठेवण्यात आलेल्या 6 ठरावांमध्ये देखील भविष्याची पाने दडली आहेत. ती प्रत्यक्षात उलटून वाचण्याचा अवकाश आहे, काँग्रेसचे भविष्य बदलेल!!

पण फक्त प्रश्न हा आहे, की त्या पानांमध्ये जे लिहिले आहे, उदाहरणार्थ घराणेशाहीतून काँग्रेस पक्ष मुक्त करा. तरुणांना संधी द्या. अल्पसंख्यांक, आदिवासी, दलित वंचित यांच्यासाठी 50 % पक्षात आरक्षण आधी द्या. मग बाहेरच्या आरक्षणाविषयी गोष्टी करा, याबाबत काही निर्णय झाला आणि काही ठोस कृती झाली तर काँग्रेसच्या भवितव्यात बदल होण्याची शक्यता आहे.

अन्यथा उदयपूर मध्ये सुरू झालेला चिंता आणि चिंतन यांचा “चिंतनीय राजकीय गरबा” गुजरात, राजस्थान, हिमाचलच्या विधानसभा निवडणुकांमध्ये जसाच्या तसा खेळावा लागण्याची शक्यता आहे!!

On the one hand, “unconcern” about leaders leaving the party; On the other hand, keep an eye on the future

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात