प्रतिनिधी
मुंबई : कोण असली कोण नकली??, गर्दीच्या भांडणात हिंदुत्वातच जुंपली!! अशी दुर्दैवी स्थिती महाराष्ट्राचा झाली आहे. In the crowd quarrel, Hindutva was involved in the house
मागील महिनाभरापासून भाजप – मनसेने शिवसेनेला रडारवर घेतले आहे. दोन्ही पक्षांनी भरगच्च सभा घेवून शिवसेनेला बेजार केले. त्यामुळे अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याला सभेमधूनच उत्तर देण्याचे ठरवले. सभेची जोरदार जाहिरातबाजी करून अखेर बीकेसीमध्ये सभा पार पडली. मात्र सभेतील मुद्दे राहिले बाजूला पण राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्क, ठाणे आणि औरंगाबाद येथे झालेल्या सभांना झालेली गर्दी आणि उद्धव ठाकरे यांच्या बीकेसी येथील सभेला झालेली गर्दी याचीच तुलना करत सभांना गर्दी खेचणारा असली कोण आणि नकली कोण? अशी चर्चा रंगली आहे.
राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेसाठी पोलिसांनी केवळ १५ हजार लोकांनाच बोलावण्याची अट घातली होती, प्रत्यक्षात पोलिसांच्या अहवालात सभेला ३० ते ३५ हजार लोक जमले होते, असे म्हटले आहे. तर उद्धव ठाकरे यांची बीकेसी येथील सभा १०० सभांची बाप असेल, असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला होता, प्रत्यक्षात सभेसाठी २०-२५ हजार जणांची उपस्थिती होती, अशी चर्चा आहे.
– शिवसेनेची सभा की सांस्कृतिक कार्यक्रम??
शिवसेनेची सभा म्हटले की, जल्लोष, उत्साह, घोषणा, मैदान खचाखच भरलेले, विचारांचे सोने लुटायला आलेले शिवसैनिक असे चित्र आजवर होते. अर्थात या सभेचे वर्णन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आहे, हे कुणीही समजेल. कारण शिवसेनेची मुंबईत बीकेसी येथे झालेल्या सभेत जे दिसले त्यावरून शिवसैनिक त्याला सभेसाठी आखून दिलेल्या नियमाच्या चौकटीत राहून उपस्थित होता का, असा प्रश्न निर्माण होतो.
संपूर्ण मैदानात रांगेत खुर्च्या लावलेल्या होत्या. या खुर्च्या किमान २०-२५ हजार असाव्यात. त्याच खुर्च्यांवर शिवसैनिक शांततेत बसलेला दिसला. सर्वसाधारण सभेसाठी व्यासपीठाच्या समोर काही प्रमाणात खुर्च्या लावून सबंध मैदानात लोक उभे राहून खचाखच गर्दी करून सभा ऐकत असतात. इथे खुर्च्या व्यतिरिक्त आजूबाजूला शिवसैनिक उभा असताना दिसला नाही.
सभेपूर्वी १ तास मैदान रिकामे होते, एका तासात मैदानातील खुर्च्या भरल्या. शिवसैनिक शांतपणे सभास्थळी आला. खुर्च्यांवर बसला. शांततेत सभा ऐकून निमूटपणे परतला.
या सभेला तासाभरात मैदानात गर्दी झाली, त्यामुळे सभेला राज्यभरातून शिवसैनिक कमी आणि मुंबई महानगरामधून अधिक आलेला का, असा प्रश्न निर्माण झाला.
सभेतील भाषणात उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यावर केलेल्या ५-६ ओळींच्या टीकेवरच काही प्रमाणात शिवसैनिकांनी टाळ्या वाजवून दाद दिली. या व्यतिरिक्त भाजपवर केलेल्या टीकेला टाळ्या वाजवताना शिवसैनिक दिसला नाही.
राज ठाकरे यांच्या संभाजीनगर येथील सभेसाठी सरकारने १५ हजार इतकीच माणसे असावीत अशी अट घातली होती. तरीही औरंगाबाद येथे सभेला याहून दुप्पट-तिप्पट गर्दी दिसली. राज ठाकरे यांना ऐकण्यासाठी राज्यभरातून मनसैनिक येताना माध्यमांनी दाखवले.
सभेला येताना मनसैनिक गटागटाने येताना दिसले. राज ठाकरे यांचे मुंबईपासून औरंगाबाद पर्यंतच्या प्रवासात मनसैनिक यांनी जिल्हा जिल्ह्यात स्वागत केले होते. राज यांच्या सोबत मनसैनिक जोडत गेले. सभेत टाळ्या, घोषणा आणि उत्साह दिसला.
राज ठाकरे यांच्या सभेनंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेची बरोबरी होऊ लागली. पण नेमका त्याच उत्साही गर्दीचा कालच्या शिवसेनेच्या सभेत अभाव दिसला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App