Omicron variant entry into India What are the symptoms of Omicron, read in details

ओमिक्रॉनची भारतात एंट्री : काय आहेत ओमिक्रॉनची लक्षणे? लागण झाल्यास तोंडाची चव आणि वास जात नाही, वाचा सविस्तर..

symptoms of Omicron : कोरोनाच्या ओमिक्रॉन प्रकाराने भारतातही शिरकाव केला आहे. आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी दुपारी पत्रकार परिषदेत खुलासा केला की, कर्नाटकात ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळले आहेत. Omicron variant entry into India What are the symptoms of Omicron, read in details


प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोनाच्या ओमिक्रॉन प्रकाराने भारतातही शिरकाव केला आहे. आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी दुपारी पत्रकार परिषदेत खुलासा केला की, कर्नाटकात ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत 30 पेक्षा जास्त देशांमध्ये पसरलेल्या या नव्या व्हेरिएंटबद्दल तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ओमिक्रॉनवर मोनोक्लोनल अँटीबॉडीज थेरपी, लसीकरण किंवा नैसर्गिक संसर्गापासून रोगप्रतिकारक प्रतिक्रियादेखील निष्प्रभावी ठरू शकते.

डेल्टापेक्षा पाचपट संसर्गजन्य

तथापि, आतापर्यंत ओमिक्रॉनचे जगभरात कोणतेही गंभीर रुग्ण आढळलेले नाहीत, परंतु डेल्टापेक्षा पाच पट संसर्गजन्य असल्याने कोविड नियमांचे पालन गरजेचे असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, आतापर्यंत ओमिक्रॉनची कोणतीही विशिष्ट लक्षणे आढळून आलेली नाहीत, परंतु दक्षिण आफ्रिकेतील डॉ. अँजेलिक कोएत्झी यांच्या मते, ओमिक्रॉनमध्ये “असामान्य, परंतु सौम्य” लक्षणे दिसत आहेत. त्या म्हणाल्या की, ओमिक्रॉनची लक्षणे डेल्टाच्या लक्षणांपेक्षा वेगळी आहेत. कोरोनाच्या इतर प्रकारांचा संसर्ग झाल्यावर चव आणि वास घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो, परंतु ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये ही लक्षणे दिसत नाहीत. यासोबतच घसा खवखवतो, पण कफाची तक्रार नसते.

काय आहेत ओमिक्रॉनची लक्षणे?

दक्षिण आफ्रिकेत सर्वात आधी या व्हेरिएंटची माहिती जगाला देणाऱ्या डॉ. अँजेलिक कोएत्झी यांनी या प्रकाराची काही लक्षणे सांगितले आहेत. यानुसार…

  • स्नायूंमध्ये वेदना
  • तोंडाची चव आणि वास घेण्याची क्षमता जात नाही.
  • सौम्य ताप
  • घशात खवखव
  • डोकेदुखी
  • थकवा
  • काही जणांमध्ये लक्षणेही दिसून येत नाहीत.

सध्या जगातील 30 देशांमध्ये या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत. संपूर्ण जगभरातील मिळून ही रुग्णसंख्या सध्या काही शेकड्यांत आहे. परंतु कोरोना नियमांचे पालन म्हणजेच सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायझर, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे यांचा अवलंब केल्यास या नव्या प्रकारापासूनही स्वत:ला सुरक्षित ठेवता येईल.

Omicron variant entry into India What are the symptoms of Omicron, read in details

महत्त्वाच्या बातम्या