विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत ओमिक्रॉनचा संसर्ग वेगाने वाढत आहे. गेल्या चोवीस तासात कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. त्याचबरोबर संसर्गाचा दर एक टक्यापेक्षा जास्त झाला आहे.Omicron infection increased in the Delhi, doubling the number of corona patients in 24 hours
दिल्लीत बुधवारी कोरोनाचे नवे 923 रुग्ण सापडले. त्यामुळे संसर्गाचा दर वाढून 1.29 टक्के झाला आहे. गेल्या सात महिन्यांत सापडले त्यापेक्षा जास्त कोरोना रुग्ण एकाच दिवशी सापडले आहे. यापूर्वी 29 मे रोजी कोरोनाचे 956 नवे रुग्ण सापडले आहेत. त्यावेळी संसर्गाचा दर 1.19 टक्के होता. गेल्या 24 तासांत 344 रुग्ण बरे झाले आहेत.
सुदैवाने गेल्या 24 तासांत एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. गेल्या चार दिवसांपासून दररोज एक रुग्णाचा मृत्यू होत होता. दिल्लीतील आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार विमानतळावर 115 रुग्ण सापडले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
त्यांचे नमुने जीनोम सिक्वेंसिंगसाठी पाठविण्यात आले आहेत.दिल्लीमध्ये ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण पाच डिसेंबर रोजी सापडला होता. त्यावेळी संसर्गाचा दर 0.11 टक्के होता. त्यानंतर 24 दिवसांत एकूण 3744 नवे रुग्ण सापडले आहेत.
पाच डिसेंबरची तुलना केल्यास कोरोनाचा संसर्ग आठ पटीने वाढला आहे. सक्रीय रुग्णांची संख्याही वाढून 2191 झाली आहे. मात्र, रुग्णालयांत केवळ 200 रुग्ण आहेत. 55 रुग्णा ऑक्सिजनवर आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App