विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोनावरील लसीचे निर्माते सायरस पूनावाला वगळता जगातील सर्व अब्जाधीशांना ओमिक्रॉन कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरिएंटने झटका दिला आहे. जगातील धनाड्यांचे अब्जावधी रुपयांचे नुकसान झाले आहे.Omicron corona virus shocks billions of worldwide, except Cyrus Poonawala
कोरोना विषाणूचा नवा प्रकार ओमिक्रॉनच्या भीतीने जगभरात धास्तीचे वातावरण आहे. त्याचा परिणाम शेअर बाजारावर झाला आहे. भारतातील अब्जाधीशांच्या संपत्तीवरही ओमिक्रॉनचा प्रभाव दिसून आला आहे. मुकेश अंबानी यांना 3.68 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. गौतम अदानी यांना सर्वांत मोठे नुकसान सोसावे लागत आहे. अदानींना 12.4 अब्ज डॉलर्सचा झटका बसला आहे.
ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सच्या ताज्या आकडेवारीनुसार, एलन मस्क, जेफ बेझोस, बर्नार्ड अर्नाल्ट, मार्क झुकेरबर्ग, लॅरी पेज आणि बिल गेट्स यांच्यासह सर्व धनकुबेरांची संपत्ती 38 अब्ज डॉलर्स म्हणजेच 28.5 खर्व रुपयांनी घटली आहे.
दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉनचा पहिला बाधित आढळल्यानंतर फक्त आफ्रिकाच नाही, तर संपूर्ण जग सतर्क झाले आहे. त्याचा वाईट परिणाम व्यापारी जगतावर होत आहे. गेल्या आठवड्यात एलन मस्क यांचे 8.38 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले. तर जेफ बेझोस यांना 3.90 अब्ज डॉलर्स आणि बर्नार्ड अर्नाल्टला 8.26 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे.
बिल गेट्स यांच्या संपत्तीत 2.68 अब्ज डॉलर्सची मोठी घट झाली आहे. लॅरी पेजची संपत्ती 3.14 अब्ज डॉलर्सने आणि युथ आयकॉन असलेल्या मार्क झुकेरबर्गची संपत्ती 2.93 अब्ज डॉलर्सने कमी झाली आहे. वॉरन बफेटसारह्यया अनेक दिग्गजांना देखील 1 ते 3 अब्ज डॉलर्सचे नुकसान सोसावे लागत आहे. जगभरातील अब्जाधीश दिवाळखोर झाले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App