कालीमातेवर आक्षेपार्ह पोस्ट, ट्विटरच्या एमडीवर गुन्हा दाखल


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कालीमातेचा आक्षेपार्ह फोटो पोस्ट केल्याप्रकरणी ट्विटरचे एमडी मनीष माहेश्वरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्लीतील एका वकीलाने याबाबत तक्रार केली होती. हा फोटो पोस्ट करणाऱ्या ट्विटर हॅँडलर एथिस्ट रिपब्लिकवरही गुन्हा दाखल झाला आहे.Offensive post on Kalimata, filing a case against the MD of Twitter

एथिस्ट रिपब्लिकने आपल्या ट्विटर हँडलवर काही टी-शर्टची छायाचित्रे पोस्ट केली आहेत. यातील एका टी-शर्टमध्ये देवी कालीचा फोटो आहे. तक्रारकर्त्याने हा फोटो आक्षेपार्ह मानून त्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.



ट्विटरवर आतापर्यंत 5 तक्रारी दाखल झाल्या आहेत. मुस्लिम वृद्धाला मारहाण प्रकरणात गाझियाबाद पोलिसांनी ट्विटरवर एफआयआर नोंदविला होता. मारहाण झालेली नसतानाच ट्विटरवरून अनेक नेत्यांनी त्याबाबत पोस्ट केली होती. देशाचा चुकीचा नकाशा दाखविल्याप्रकरणी बुलंद शहरात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मध्य प्रदेशच्या सायबर सेलमध्ये देशाचा नकाशा चुकीच्या पद्धतीने दाखवल्याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला होता. चाईल्ड पोर्नोग्राफिक कंटेट प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने गुन्हा दाखल केला होता. आता हिंदू देवीचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

केंद्र सरकार आणि ट्विटरमध्ये नवीन आयटी नियमांवरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे. ट्विटरने यापूर्वी कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांचे ट्विटर हँडल एक तासासाठी ब्लॉक केले होते. त्यांनी अमेरिकेच्या डिजिटल मिलेनियम कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन केले असल्याचे यामागे कारण असल्याचे सांगण्यात आले होते.

परंतु, नंतर ट्विटरने रविशंकर प्रसाद यांना इशारा देत त्यांचे ट्विटर हँडल पुन्हा सुरू केले.केंद्र सरकारच्या प्रयत्नांनंतर ट्विटरने आणखी एक पाऊल मागे घेतलेआहे. उच्च न्यायालयात ट्विटरने सांगितले की, आम्ही केंद्र सरकारच्या आयटी नियमांचे पालन करीत असून अंतरिम तक्रार अधिकारी नियुक्त करण्याच्या अंतिम टप्प्यात आहोत.

त्यामुळे आम्ही नियमांचे पालन करीत नाही, हे सांगणे चुकीचे आहे. आयटी नियमांनुसार मुख्य अनुपालन अधिकारी अंतरिम रहिवासी तक्रार अधिकाºयाची नियुक्ती येत्या काही दिवसांत होईल. त्यासोबतच भारतातील तक्रारीचे निवारण करण्यासाठी भारतात एक तक्रार अधिकारी काम करत असल्याचे ते म्हणाले.

केंद्र सरकारने 25 मे रोजी जारी केलेल्या नवीन नियमांनुसार सर्व सोशल मीडिया कंपन्यांना आपले वापरकर्ते आणि पीडितांच्या तक्रारी दूर करण्यासाठी एक यंत्रणा तयारी करावी लागणार आहे. ज्या सोशल मीडियाचे 50 लाखांवर वापरकर्ते आहे त्यांना एका तक्रार अधिकाऱ्याची नियुक्ती करणे गरजेचे आहे.

त्यासोबतच ज्या अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली त्यांचे नाव, फोन नंबर आणि संपूर्ण पत्ता आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावा लागणार आहे.विशेष अट म्हणजे नियुक्त करण्यात आलेल्य अधिकाऱ्याला भारतातच राहावे लागणार आहे. ट्विटरचे भारतातील प्रभारी निवासी तक्रार अधिकारी धर्मेंद्र चतूर यांनी काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला आहे.

Offensive post on Kalimata, filing a case against the MD of Twitter

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात