Positive news : ओरिसात रस्त्यावरच्या भटक्या प्राण्यांनाही मुख्यमंत्री निधीतून अन्न – पाणी…!!


वृत्तसंस्था

भूवनेश्वर : कोरोना काळात संसर्गाचे आकडे आणि मृतांचे आकडे सामान्यांच्या मनात धडकी भरवत असताना सरकारपासून खासगी संस्थांपर्यंत आणि स्वयंसेवी संस्थांपासून व्यक्तीसमूहांपर्यंत आपापल्या मगदूरानुसार सगळेजण काही सकारात्मक कामेही करताना दिसत आहेत. कोरोनाच्या अंधःकारातील या प्रकाशज्योतीच आहेत.Odisha Govt is feeding stray animals during COVID19 induced lockdown

अशाच काही प्रकाशज्योती ओरिसात चमकत आहेत. ओरिसात नवीन पटनाईक यांच्या राज्य सरकारतर्फे भटक्या प्राण्यांना अन्नदान करण्यात येत आहे. रस्त्यावर भटकणाऱ्या गायी – बैल, कुत्री, मांजरी, माकडे आदी प्राण्यांना कोरोना काळातआणि उन्हाळ्याच्या काहिलीतून दिलासा देण्यासाठी राज्य सरकार पुढे आले आहे. काही स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने या मुक्या प्राण्यांना अन्न – पाणी पुरविण्यात येत आहे.

रस्त्यावर भटकणारे प्राणी, गायी – बैल, कुत्री, मांजरी, माकडे आदी प्राण्यांना त्यांच्या गरजेनुसार खाण्यायोग्य अन्न – पाणी मिळविण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी ओरिसाच्या मुख्यमंत्री निधीतून पैसा पुरविण्यात येत आहे.

कोरोना काळात संकटग्रस्त माणसांसाठी अनेक सरकारे, संस्था, संघटना, व्यक्ती, व्यक्ती समूह झटताना दिसत आहेत. पण प्राण्यांसाठी अनोखा अन्नदानाचा उपक्रम घेऊन ओरिसा सरकार आणि तेथील प्राणिमित्र तसेच स्वयंसेवी संस्था या मुक्या प्राण्यांचा दूवा मिळवताना दिसत आहेत.

Odisha Govt is feeding stray animals during COVID19 induced lockdown

 

 

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण