प्रतिनिधी
नवी दिल्ली : ओबीसी आरक्षणा संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे – पवार सरकारची याचिका फेटाळल्यानंतर काँग्रेस – राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्याचे दोषारोपण केंद्रातल्या मोदी सरकारवर केले आहे. परंतु प्रत्यक्षात नेमकी वस्तुस्थिती काय आहे? केंद्र सरकारने ओबीसी एम्पिरिकल डेटा द्यायला का नकार दिला आहे? त्या डेटामध्ये नेमक्या कोणत्या उणिवा आहेत? केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात कोणता युक्तिवाद केला आहे?, याची तपशीलवार माहिती घेतली तर वेगळी वस्तुस्थिती समोर येते. OBC Reservation; Why didn’t the state government complete the triple test? Why didn’t the state government appoint a commission even after giving notice by the center?
ओबीसी आरक्षणासंदर्भातली महाराष्ट्र सरकारची याचिका बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. या मुद्द्यावरून मोठे राजकारण सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाच्या स्थगितीचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवलाय. केंद्राने राज्याला एम्पिरीकल डाटा द्यावा किंवा तसा डाटा राज्य सरकार तयार करेपर्यंत संपूर्ण निवडणूकच रद्द करा, अशी याचिका राज्य सरकारने केली होती.
त्यावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, राज्याने आरक्षण लागू करण्यासाठी ट्रिपल टेस्ट पूर्ण करायला हवी. पण त्यासाठी केंद्राने डेटा शेअर करावाच, असे निर्देश दिले जाऊ शकत नाहीत. कारण केंद्राच्या म्हणण्यानुसार, तो डेटा निरुपयोगी आहे. राज्य सरकारच्या वतीने मुकुल रोहतगी यांनी युक्तीवाद केला तर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी यावेळी केंद्र सरकारची बाजू मांडली.
केंद्र सरकारने दिलेल्या या स्पष्टीकरणानंतर सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले आहे राज्य सरकारने आयोग का नेमला नाही?, ट्रिपल टेस्ट पूर्ण का केली नाही? असे नेमके सवाल सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला केले आहेत. त्यावर राज्य सरकारला अद्याप उत्तर देता आलेले नाही. राज्य सरकार मध्ये सहभागी असलेले काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते फक्त केंद्रावर याबाबत आरोप करून मोकळे होताना दिसत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App