देशातील १७ कोटी २४ लाख घरांपैकी ४४ टक्क्यांहून अधिक घरे ‘ओबीसीं’ची


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशातील १७ कोटी २४ लाख घरांपैकी ४४ टक्क्यांहून अधिक घरे ‘ओबीसीं’ची आहेत. देशातील ग्रामीण भागातील एकूण घरांपैकी ४४.४ टक्के घरे ओबीसींची आहेत. OBC dominates Rural India

देशातील ग्रामीण भागामध्ये इतर मागासवर्गीय जातींमधील कुटुंबांच्या घरांची संख्या मोठी असल्याचे दिसून आले आहे. सरकारच्याच एका संस्थेने सादर केलेल्या अहवालातच ही आकडेवारी देण्यात आली आहे.नॅशनल सांख्यिकी विभागाने ग्रामीण भारतातील शेतकरी कुटुंबांच्या स्थितीबाबत केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध झाला आहे. तमिळनाडू, बिहार, तेलंगण, उत्तर प्रदेश, केरळ, कर्नाटक आणि छत्तीसगड या राज्यांमधील ग्रामीण भागात ओबीसी कुटुंबांच्या संख्येचे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत अधिक आहे. लोकसभेतील २३५ सदस्य या राज्यांतून येतात.

  • एकूण घरे : १७ कोटी २० लाख
  • ओबीसी : ४४.४ टक्के
  • अनुसूचित जाती : २१.६ टक्के
  • अनुसूचित जमाती : १२.३ टक्के
  • इतर मिळून : २१.७ टक्के

OBC dominates Rural India

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण