वृत्तसंस्था
नवी दिल्ली : प्रेषित महंमद यांच्या बद्दल प्रक्षोभक वक्तव्य केल्याबद्दल नुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले आहे. तुमच्या वक्तव्याने देशातील वातावरण बिघडले आहे, तुम्ही माफी मागावी, असे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. Nupur Sharma: The atmosphere in the country has deteriorated because of you, apologize to the country
तुम्ही स्वतःला वकील म्हणवता आणि वर अत्यंत बेजबाबदार वक्तव्य करता. तुमच्या वक्तव्यामुळे देशातील वातावरण बिघडले आहे. तुमच्या वक्तव्यामुळे देशाची बदनामी झाली आहे. यासोबतच सुप्रीम कोर्टाने नुपूर शर्माची याचिका फेटाळून लावली. याप्रकरणी तुम्ही हायकोर्टात जा, असे न्यायालयाने सांगितले. नुपूर शर्मा यांनी त्यांच्याविरुद्ध विविध राज्यांत दाखल झालेले सर्व खटले दिल्लीला हस्तांतरित करण्यासाठी अर्ज केला होता.
नुपूर शर्मा यांनी आधीच माफी मागितली आहे, असे नुपूर सर्वांच्या वकिलांनी लक्षात आणून देताच त्यावर देखील तुमची माफी जर तर च्या भाषेत म्हणजे सशर्त असल्याचे टिपणी सुप्रीम कोर्टाने केली. मूळात या प्रकरणी कडक भूमिका घेत, तुम्ही माफी मागायला उशीर केला, असे ताशेरेही कोर्टाने ओढले दिल्ली पोलिसांनी राजधानीत दाखल केलेल्या तक्रारीवर आतापर्यंत केलेल्या कारवाईवरही प्रश्न उपस्थित करून केवळ नुपूर शर्माच्या वक्तव्यामुळे उदयपूरची घटना घडल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. तुम्हाला असे वक्तव्य करण्याची काय गरज होती?, असा सवाल सुप्रीम कोर्टाने केला.
ज्ञानवापी मशिदीत सापडलेल्या कथित शिवलिंगासंदर्भात एका टीव्ही चर्चेदरम्यान नुपूर शर्माने प्रेषित मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केले होते, त्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. यानंतर भाजपने राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांची हकालपट्टी केली होती. इतकेच नाही तर पक्षाच्या दिल्ली युनिटचे मीडिया प्रमुख नवीन कुमार जिंदाल यांचीही हकालपट्टी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App