वृत्तसंस्था
नवी दिल्ली : ओमिक्रॉनची दहशत सर्व जगाला वाटत असताना फ्रान्सकमधील शास्त्रज्ञांना ओमिक्रॉनपेक्षा नवा प्रकार आढळला आहे. त्यांनी या विषाणूला ‘आयएचयू’ (बी.१.६४०.२) असे नाव दिले आहे. Now scientists in France have discovered a new type of omicron
सध्या जगातील अनेक भागात ओमिक्रॉनचा प्रसार होत झालेला आहे तर ‘आयएचयू’च्या धोकाही वाढण्याची शक्यता आहे. मात्र सध्या तरी हा प्रकार अन्य देशांत आढळलेला नाही किंवा जागतिक आरोग्यय संघटनेच्या तपासणीत त्याची अधिकृत घोषणा केलेली नाही.
‘आयएचयू’मध्ये ४७ उत्परिवर्तने आढळली आहेत. ओमिक्रॉनपेक्षाही तो जास्त परिवर्तनीय आहे. म्हणूनच त्याच्यात लस प्रतिरोधकाची क्षमता मोठ्या प्रमाणावर असून तो जास्त संसर्गजन्य आहे. मार्सेलिसमध्ये या प्रकाराची लागण झालेले १२ रुग्ण सापडले आहेत. त्यातील बहुतेकजण कॅमेरून या आफ्रिकी देशात जाऊन आलेले आहेत, अशी माहिती संशोधकांनी दिली.
ऑक्सफर्ड नॅनोपोर टेक्नॉलॉजीच्या ग्रीडऑन या उपकरणावरील आधुनिक जनुकीय आराखड्यातून मिळविलेल्या जनुकांमध्ये १४ अमिनो आम्लाचे पर्याय स्पाईक प्रोटिनमध्येत आढळले. यात ‘एन५०१वाय’ आणि ‘ई४८४के’सह नऊ जनुकीय बदलांचा समावेश आहे. जनुकांच्या या रचनेचा समावेश ‘बी.१.६४०.२’ या नव्या गटात केला आहे. ‘बी.१.६४०’ या या उत्क्रांत गटातील तो आहे, असे या संशोधनपर माहितीत नमूद केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App