गुगल ट्रान्सलेटरवर आता संस्कृत, कोकणी आणि भोजपुरीसह 8 नव्या प्रादेशिक भाषांचा समावेश


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : गुगलने भाषांतरासाठी मोठे अपडेट केले आहे. भारतातल्या 8 नवीन प्रादेशिक भाषांचा गुगल ट्रान्सलेटरने समावेश केला आहे. त्यामध्ये संस्कृत, कोकणी आणि भोजपुरी भाषांचाही समावेश आहे. त्यामुळे आता गुगल ट्रान्सलेटरवर भारतीय भाषांची संख्या १९ वर पोहचली आहे. Now Sanskrit, Konkani and Bhojpuri on Google Translator

संस्कृत गुगल भाषांतरात प्रथम क्रमांकाची

गुगलच्या नवीन अपडेटनंतर गुगल ट्रान्सलेटर मध्ये संस्कृत, आसामी, भोजपुरी, डोगरी, कोकणी, मैथिली, मिझो आणि मणिपुरीमध्ये भाषांतर करता येणार आहे. या अपडेटनंतर जगभरातील एकूण १३३ भाषांमध्ये भाषांतर करता येणार आहे. बुधवारी उशिरा सुरू झालेल्या वार्षिक गुगल परिषदेत ही घोषणा करण्यात आली. सध्या गुगल भाषांतर प्लॅटफॉर्मवर नवनवीन प्रादेशिक भाषा जोडत आहे.

आसामी भाषा ईशान्य भारतातील सुमारे 2.5 कोटी लोक वापरतात. भोजपुरी सुमारे 5 कोटी लोक वापरतात. कोकणीमध्ये भारतातील सुमारे २० लाख लोक वापरतात. संस्कृत ही गुगल भाषांतरात प्रथम क्रमांकाची आणि सर्वाधिक विनंती केलेली भाषा आहे आणि आता आम्ही ती जोडत आहोत, असे गुगलच्या अभियंत्यांनी म्हटले आहे.

Now Sanskrit, Konkani and Bhojpuri on Google Translator

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”