राहुल गांधींचे परकीय फार्मा कंपन्यांसाठी लॉबिंग, अनेक देशांचे दौरे केले, पण माहितीच दिली नाही; रविशंकर प्रसादांची खोचक टीका

वृत्तसंस्था

नवी दिल्ली :  देशभर कोरोना प्रतिबंधक लसपुरवठ्यावरून काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधींनी केंद्र सरकारवर निशाणा साधल्यावर भाजपने त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. देशात लसीची कमतरता नाही, पण राहुलजींना प्रसिद्धीची कमतरता भासते आहे.Now rahul gandhi is lobbying for pharma companies by asking for approvals for foreign vaccines: Union Min RS Prasad

ते सध्या परकीय फार्मा कंपन्यांसाठी लॉबिंग करीत आहेत. त्यांनी अनेक देशांचे दौरेही केले आहेत पण त्यांची माहिती ते देत नाहीत. त्यांनी अजून कोरोना प्रतिबंधक लसही घेतलेली नाही, अशी टीका केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी केली आहे.


राहुल गांधींची जीभ पुन्हा घसरली, म्हणाले- भारत आता लोकशाही देश नाही, स्वीडनच्या रिपोर्टचा दिला हवाला

 


तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारत राहुल गांधी ट्वीट केले की आपल्या देशवासीयांना धोक्यात टाकून लसीची निर्यात योग्य आहे का? वाढत्या कोरोना संकटामध्ये लसीचा अभाव ही एक गंभीर समस्या आहे, उत्सव नव्हे. केंद्राने सर्व राज्यांना कोणताही भेदभाव न करता मदत करावी. आपल्या सर्वांना एकत्रितपणे या महामारीचा पराभव करावा लागेल.

राहुल गांधींच्या टीकेला रविशंकर प्रसाद यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, की राहुल गांधी यांनी पूर्णवेळाचे राजकारण सोडून पूर्णवेळाचे लॉबिंग सुरू केले आहे. आधी त्यांनी लढाऊ विमानांच्या कंपन्यांसाठी लॉबिंग केले पण भारतात विमान पुरवठ्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला.

आता परकीय लसीला मान्यता देण्याची मागणी करून ते फार्मा कंपन्यासाठी लॉबिंग करायला लागले आहेत. त्यांनी आत्तापर्यंत अनेक देशांचे दौरे केले पण त्याची माहिती सार्वजनिक केली नाही. त्यांनी अजूनपर्यंत कोरोना प्रतिबंधक लसही घेतलेली नाही.

राहुल गांधींच्या काँग्रेसच्या राज्यांमध्ये लसींची कमतरता नाही. तर मूलभूत आरोग्य व्यवस्थेकडे त्यांच्या सरकारांनी लक्ष देण्यातली कमतरता आहे. राहुलजींनी त्यांच्या राज्य सरकारांना वसूली थांबवून लोकांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास सांगितले पाहिजे.

Now rahul gandhi is lobbying for pharma companies by asking for approvals for foreign vaccines: Union Min RS Prasad